CSK vs DC Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: पाथिराना इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उतरणार? असे आहेत चेन्नई - दिल्लीचे Playing XI

CSK vs DC: आयपीएल २०२३ स्पर्धेत बुधवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना खेळवला जात आहे.

Pranali Kodre

Chennai Super Kings vs Delhi Capitals: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत बुधवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात 55 वा सामना खेळला जात आहे. चेन्नईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडियमवर (चेपॉक स्टेडियम) होत आहे.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी दोन्ही संघांमध्ये बदल करण्यात आला आहे. चेन्नईने मथिशा पाथिराना ऐवजी प्लेइंग इलेव्हनमध्ये अंबाती रायुडूला स्थान दिले आहे. त्यामुळे चेन्नई पाथिरानाला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उतरवू शकतात. तसेच दिल्ली संघाने मनिष पांडे ऐवजी प्लेइंग इलेव्हनमध्ये ललित यादवला संधी दिली आहे.

या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये चेन्नईने डेव्हॉन कॉनवे, मोईन अली आणि महिश तिक्षणा या परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे. तसेच दिल्लीने कर्णधार डेव्हिड वॉर्नरसह फिलिप सॉल्ट, मिचेल मार्श आणि रिली रोसौ या परदेशी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

त्यामुळे चेन्नईने प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन परदेशी खेळाडू खेळवल्याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून ते परदेशी किंवा भारतीय खेळाडूला वापरू शकतात. मात्र दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ४ परदेशी खेळाडू असल्याने दिल्लीला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून भारतीय खेळाडूलाच वापरता येणार आहे.

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी राखीव खेळाडूंमध्ये चेन्नईने मथिशा पाथिराना, सुभ्रांशू सेनापती, मिचेल सँटेनर, आकाश सिंग आणि शेख राशिद यांची निवड केली आहे. तर दिल्लीने मुकेश कुमार, मनिष पांडे, प्रविण दुबे, अभिषेक पोरेल आणि चेतन साकारिया या खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

  • चेन्नई सुपर किंग्स - ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक / कर्णधार), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महिश तिक्षणा

  • दिल्ली कॅपिटल्स - डेव्हिड वॉर्नर (कर्णधाक), फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), मिचेल मार्श, रिली रोसौ, अक्षर पटेल, अमन हकीम खान, रिपल पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, खलील अहमद, इशांत शर्मा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Royal Enfield Bike: रॉयल एनफील्ड 'मीटिओर 350' नव्या अवतारात बाजारात दाखल, जाणून किंमत, फीचर्स आणि डिझाइनमधील मोठे बदल

Asia Cup 2025: टी-20 क्रिकेटमध्ये यूएईच्या मोहम्मद वसीमचा वर्ल्ड रेकॉर्ड! बटलरला मागे टाकत रचला नवा इतिहास VIDEO

Viral Video: लग्नासाठी घरचे तयार नाही झाले तर काय कराल? पठ्ठ्यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले...

Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्यावरुन गोव्यात रंगलं राजकारण; भाजप प्रदेशाध्यक्षांनी पवारांचं अज्ञानच काढलं

India vs Pakistan: ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है... Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान आणखी दोनवेळा भिडणार, संपूर्ण 'गणित' समजून घ्या

SCROLL FOR NEXT