Shikhar Dhawan|PBKS vs CSK Dainik Gomantak
क्रीडा

PBKS vs CSK: शिखर धवनने रचला इतिहास

आयपीएलमध्ये हा पराक्रम करणारा दुसरा फलंदाज ठरला

दैनिक गोमन्तक

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या IPL 2022 च्या 38 व्या सामन्यात शिखर धवनने इतिहास रचला. या सामन्यात दोन धावा करताच शिखर धवन आयपीएलमध्ये 6000 धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. धवनसाठी हा सामना खूप खास आहे, कारण हा धवनचा आयपीएल कारकिर्दीतील 200 वा सामना आहे.

शिखर धवनने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील 200 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध खेळताना 2 धावा करताच 6000 धावांचा टप्पा गाठला.

या सामन्यापूर्वी त्याने 199 IPL सामन्यात 5998 धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत धवन दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये 6000 धावा करणारा तो दुसरा फलंदाज आहे.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रवींद्र जडेजाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जचा कर्णधार मयंक अग्रवालने या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन बदल केले आहेत. भानुका राजपक्षे, ऋषी धवन आणि संदीप शर्मा यांना आज संधी मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT