Shimron & Nirvani Dainik Gomantak
क्रीडा

शिमरॉन हेटमायरच्या पत्नीवरुन IPLमध्ये गोंधळ, जाणून घ्या कोण आहे निरवानी?

आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये शुक्रवारी राजस्थानविरुद्धच्या सामन्यात विस्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायरने अवघ्या सहा धावा केल्या.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 मध्ये शुक्रवारी राजस्थानविरुद्धच्या सामन्यात विस्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायरने अवघ्या सहा धावा केल्या. असे असूनही त्याचा संघ जिंकला. मात्र, सामन्यादरम्यान सुनील गावसकर यांनी हेटमायरच्या पत्नीबाबत वक्तव्य केले होते, ज्यामुळे ते चांगलेच ट्रोल झाले होते. (ipl 2022 Nirvani the wife of Shimron Heitmeyer is a supermodel)

दरम्यान, शिमरॉनची पत्नी निरवानी हे वेस्ट इंडिजमध्ये (West Indies) छोटे नाव नाही. शिमरॉन हेटमायरची पत्नी एक सुपरमॉडेल आहे. विशेष म्हणजे कॅरिबियन बेटावरील सर्वात सुंदर महिलांपैकी एक आहे. तिच्या कामाबद्दल फारशी माहिती मिळालेली नाही, परंतु काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, निरवानीचे वडील जमैकाचे व्यापारी आहेत. निरवानी आणि शिमरॉन हे सोशल मीडियावर (Social Media) मित्र होते. शिमरॉनने आधी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि नंतर मेसेज करत राहिला. बऱ्याच दिवसांनी निरवानी शिमरॉनकडे आकर्षित झाली आणि दोघेही एकमेकांना डेट करु लागले.

तसेच, 2019 च्या ख्रिसमसच्या दिवशी, हेटमायरने निरवानीला लग्नासाठी प्रपोज केले. त्यानंतर निरवानीने अंगठीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना ही आनंदाची बातमी दिली. निरवानीही आयपीएलदरम्यान (IPL 2022) अनेकदा स्टेडियममध्ये दिसली आहे. हेटमायरने अनेक वेळा सांगितले आहे की, 'माझी पत्नी खूप गमतीदार आहे आणि म्हणूनच मला ती आवडते.'

दुसरीकडे, सध्या निरवानी भारतात नसली तरी ती चर्चेत आहे. शुक्रवारच्या सामन्यात सुनील गावसकर (Sunil Gavaskar) हेटमायरच्या फलंदाजीबद्दल म्हणाले होते की, 'शिमरॉन हेटमायरच्या पत्नीची प्रसूती झाली आहे. हेटमायर आता राजस्थानसाठी डिलिव्हरी देईल का?'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT