virat kohli rohit sharma Twitter
क्रीडा

MI vs DC: किंग कोहलीचा विक्रम हिटमॅन रोहितच्या निशाण्यावर

आयपीएल आणि चॅम्पियन्स लीगमध्ये मुंबईकडून खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये 200 षटकार पूर्ण करण्यासाठी त्याला 8 षटकारांची गरज आहे.

दैनिक गोमन्तक

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) हा आयपीएलचा (IPL 2022) सर्वात यशस्वी संघ आहे. आज रविवारी हा संघ दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) त्यांच्या पहिल्या सामन्यात खेळणार आहे, तेव्हा यावेळी गेल्या हंगामातील निराशेवर मात करण्याचा त्यांचा मानस असेल. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. गेल्या मोसमात खराब नेट रनरेटमुळे मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला होता. तेव्हा आता या दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पहायला मिळणार आहे. गेल्या दोन हंगामात पाहिले तर ऋषभ पंतच्या संघावर रोहितची मुंबई इंडियन्स टिम भारी पडली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ मुंबईविरुद्धचे शेवटचे तीन सामने जिंकण्यात यशस्वी ठरला.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा दिल्लीविरुद्धच्या सामन्यात वैयक्तिक कामगिरी करू शकतो. विराट कोहलीने (Virat Kohli) दिल्लीविरुद्ध केलेल्या सर्वोच्च धावांचा विक्रम मोडण्यापासून तो केवळ 45 धावा दूर आहेत . रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) माजी कर्णधार विराटने दिल्लीविरुद्ध 913 धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माने दिल्लीविरुद्ध 869 धावा केल्या आहेत.

हिटमॅन हा विक्रम करू शकतो

रोहित शर्मा आयपीएलमध्ये 900 चौकार पूर्ण करण्यापासून फक्त 9 चौकार दूर आहे. जर त्याने आणखी 9 चौकार मारले तर तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक चौकार मारणारा पाचवा फलंदाज ठरेल. आयपीएल आणि चॅम्पियन्स लीगमध्ये मुंबईकडून खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये 200 षटकार पूर्ण करण्यासाठी त्याला 8 षटकारांची गरज आहे. रोहित जर असे करण्यात यशस्वी ठरला तर तो मुंबईसाठी आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू बनेल.

मुंबई इंडियन्सचा खराब रेकॉर्ड

इंडियन प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्सच्या मोसमातील पहिल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर त्याचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. या संघाने आयपीएलमधील पहिला सामना केवळ चार वेळा जिंकला आहे. मुंबई संघाने शेवटचा पहिला सामना 2012 मध्ये जिंकला होता. तर, दिल्ली कॅपिटल्सचा रेकॉर्ड चांगला आहे. दिल्लीने इंडियन प्रीमियर लीगमधील पहिला सामना सात वेळा जिंकला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT