lucknow super giants Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022: लखनऊ सुपर जायंट्सने टीमचा लोगो केला लॉन्च

इंडियन प्रीमियर लीगची (IPL 2022) नवी फ्रँचायझी असलेल्या लखनौ सुपर जायंट्सने सोमवारी आपला लोगो जारी केला. हा लोगो 'गरुड' पक्ष्यावर आधारित असून त्यावर तिरंग्याचे तीन रंगही आहेत.

दैनिक गोमन्तक

इंडियन प्रीमियर लीगची नवी फ्रँचायझी असलेल्या लखनौ सुपर जायंट्सने सोमवारी आपला लोगो जारी केला. हा लोगो 'गरुड' पक्ष्यावर आधारित असून त्यावर तिरंग्याचे तीन रंगही आहेत. लोगोच्या मध्यभागी एक बॅट आहे, जी निळ्या रंगाची असून त्याच्या मध्यभागी एक लाल चेंडू आहे. संघाचे नावही निळ्या रंगात लिहिले आहे. (IPL 2022 Lucknow Super Giants Team Logo Announced)

दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सने (lucknow Super Giants) त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर व्हिडिओद्वारे लोगोचे अनावरण केले. हे घोषित करताना, कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, लखनऊ सुपर जायंट्स आपले पंखाचं बळ मजबूत करण्यासाठी सज्ज आहे. यापूर्वी 24 जानेवारी रोजी लखनौ फ्रँचायझीने अधिकृतपणे आपल्या संघाच्या नावाची घोषणा केली होती. RPSG ग्रुपने लखनौचा संघ 7090 कोटी रुपयांच्या बोलीवर विकत घेतला होता.

तसेच, लखनौ सुपर जायंट्स संघाने 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मेगा लिलावापूर्वी आयपीएल 2022 साठी संघात तीन खेळाडूंचा समावेश केला होता. या संघात भारताचा सुपरस्टार फलंदाज केएल राहुलचा समावेश करण्यात आला आहे, जो संघाचा कर्णधार असणार आहे. केएल राहुल याआधी पंजाब किंग्जचा (Punjab Kings) कर्णधार होता. पंजाबला त्याला या मोसमात कायम ठेवायचे होते, परंतु केएल राहुलने (KL Rahul) नकार दिला. मात्र, राहुलच्या नेतृत्वाखाली पंजाबची कामगिरी दोन्ही हंगामात सुमारचं होती. त्याच वेळी, राहुल व्यतिरिक्त, लखनौ फ्रँचायझीने अष्टपैलू मार्कस स्टाइनिस आणि फिरकीपटू रब्बी बिश्नोई यांना त्यांच्या संघात सामील केले होते. याशिवाय गौतम गंभीरला या संघाचा मार्गदर्शक तर अँडी फ्लॉवर संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandovi River Casino: मांडवीत नवा कॅसिनो येणार की रोखला जाणार? सरकार आणि कंपनीच्या दाव्यांमधील विसंगती न्यायालयासमोर उघड; भूमिकेवरच सवाल

Karnataka Goa Island Dispute: गोव्‍याच्‍या ताब्‍यातील 16 बेटांवर कर्नाटकचा दावा! केंद्राला पत्र, सीमावाद पेटणार

Horoscope 30 April 2026: अक्षय्य तृतीयेचा सुवर्णयोग! 'या' राशींंचं पालटणार नशीब, गुंतवणुकीतून मिळणार चांगला परतावा; मेहनतीला यशाची सुवर्ण जोड

आंबा खाताय की विष? कॅल्शिअम कार्बाइडचा नफेखोरीसाठी वापर; ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरु

Goa Police: गोव्यातील 25 मोठे गुन्हे क्राईम ब्रांचच्या ताब्यात ! गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास आता वेगाने; पोलीस ठाण्यांतून गुन्हे वर्ग

SCROLL FOR NEXT