गुजरात टायटन्स (GT) ला सोमवारी IPL 2022 मधील पहिला पराभव स्वीकारावा लागला. एकतर्फी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (SRH) गुजरातचा 8 गडी राखून पराभव केला. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने या सामन्यात अर्धशतक ठोकले पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आता हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ व्हायरल (Video-viral) होत आहे, ज्यामध्ये लोक त्याच्यावर दाखवलेल्या रागावर संतापले आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सनरायझर्स हैदराबादची फलंदाजी सुरू असताना कर्णधार हार्दिक पांड्या मोहम्मद शमीवर चिडला. राहुल त्रिपाठीने थर्ड मॅनवर खेळलेला फटका थेट मोहम्मद शमीकडे गेला. मात्र, मोहम्मद शमीने तो पकडण्याचा प्रयत्न केला नाही. यावर हार्दिक पांड्या भडकला आणि त्याने मोहम्मद शमीला फटकारले. मोहम्मद शमी पुढे जाऊन झेल घेईल, अशी आशा हार्दिकला होती. पण असे झाले नाही.
आता तोच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हार्दिक पांड्याचे (Hardik Pandya) बोलने लोकांंना ऐकू येत आहे. काही वापरकर्त्यांनी लिहिले की, त्यांच्याच खेळाडूंना अशा प्रकारे शिवीगाळ करणे योग्य नाही. त्याचवेळी, काहींनी लिहिले की, हार्दिक पांड्या दिग्गज नाही, तो चुकून गुजरात टायटन्सचा कर्णधार झाला आहे. त्यामुळे खेळाडूंचा आदर करा.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) 162 धावा केल्या, ज्यामध्ये हार्दिक पंड्याचे अर्धशतक देखील समाविष्ट होते. मात्र सनरायझर्स हैदराबादने हे लक्ष्य सहज गाठले. त्याचा कर्णधार केन विल्यमसननेही हैदराबादसाठी शानदार खेळी खेळली.
हार्दिक पांड्या पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करत आहे. या मोसमात त्याची सुरुवात चांगली झाली असून त्याने सलग तीन सामने जिंकले आहेत, पण गुजरात टायटन्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.