कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यावर कोहलीने अखेर आपले मौन सोडले. Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2021: ...म्हणून सोडले कर्णधारपद, विराटचे स्पष्टीकरण

मला माझ्या जबाबदाऱ्यांबद्दल अप्रामाणिक व्हायचे नाही. जर मी काही कामांना 120 टक्के देऊ शकत नाही तर मी ते करुन काय फायदा नाही.

दैनिक गोमन्तक

विराट कोहलीने (Virat Kohli) काही दिवसांपूर्वी भारतीय टी 20 संघ (Indian T20 team) आणि IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (Royal Challengers Bangalore) कर्णधारपदावरून (Captaincy) पायउतार होण्याचा निर्णय घेतला. टी -20 विश्वचषकानंतर तो भारतीय संघाचे कर्णधारपद सोडणार आहे, आयपीएलच्या या मोसमानंतर बंगळुरूच्या कर्णधारपदावरून तो पायउतार होईल. कोहलीच्या या निर्णयाने त्याच्या चाहत्यांची खूप निराशा झाली.

यावर कोहलीने अखेर आपले मौन सोडले आहे. तो म्हणाला, या निर्णयामागील सर्वात मोठे कारण म्हणजे कामाचा भार आणि व्यवस्थापन हेच आहे. भारतीय कर्णधाराने स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, माझा कोणतेही काम 120 टक्के करण्याचा प्रयत्न असतो. 'सर्वप्रथम, कामाचा ताण हे यामागील मुख्य कारण होते. मला माझ्या जबाबदाऱ्यांबद्दल अप्रामाणिक व्हायचे नाही. जर मी काही कामांना 120 टक्के देऊ शकत नाही तर मी ते करुन काय फायदा नाही.

2013 च्या आयपीएल हंगामात कोहलीने बंगळुरूचे कर्णधारपद स्वीकारले. त्याच्या आधी डॅनियल व्हिटोरी ही भूमिका साकारत होता. दरम्यान, बंगळूरचा संघ चार वेळा प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. 2016 मध्ये बंगळुरला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. IPLच्या या मोसमानंतर तो बंगळुरूच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचे विराटने याआधीच स्पष्ट केले आहे. दरम्यान, कोहली आपल्या संघाचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा आणि त्यांना बंगळूरला प्रथमच चॅम्पियन बनवण्याचा प्रयत्न करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT