Virendra Sehwag & Shubhman Gill (IPL 2021) Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2021: शुभमन गिलकडे आहे दिग्गजांसारखा खेळ करण्याची क्षमता; वीरेंद्र सेहवाग

गिलने आरसीबी विरुद्ध खेळताना चोपल्या 34 चेंडूत 48 धावा

Dainik Gomantak

IPL 2021: भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग (Former Indian Opener Virendra Sehwag) याच्या मते केकेआर (KKR) चा फलंदाज शुभमन गिल (KKR Batsman Shubhaman Gill) मोकळेपणाने खेळला तर त्याच्यात दिग्गजांना सारखे खेळण्याची क्षमता आहे. सोमवारी अबुधाबी (Abu Dhabi) मध्ये केकेआरचा सलामी फलंदाज गिलने आरसीबी (RCB) विरुद्ध चमकदार कामगिरी करताना 34 चेंडूत 48 धावा चोपल्या व कोलकत्ता नाईट रायडर्सने 9 गडी राखून सहज विजय प्राप्त केला.

आरसीबीने दिलेल्या 93 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना शुभमन गिलची फीअरलेस फलंदाजी पाहताना केकेआरच्या चाहत्यांना समाधान वाटत होते. गिलने चहलच्या गोलंदाजीवर 10 व्या षटकात बाद होण्यापूर्वी सहा चौकार आणि एक षटकारासह 48 धावांची खेळी साकारली. भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांनी शुभमन गिलच्या फलंदाजीच्या शैलीबद्दल खूप बोलला. सेहवाग म्हणाला, दिल ने फलंदाजी करताना नेहमी मोकळ्या मनाने खेळावे तसेच त्याने बनवलेल्या धावा, त्याच्या नावाला त्रासदायक नसाव्यात.

कोणत्याही परिस्थितीत शुभमन गिल ने धावांची चिंता न करता मुक्तपणे फलंदाजी केली पाहिजे. कारण त्याच्यामागे 9 फलंदाज शिल्लक असतील. एखादा साधारण चेंडू आला तर त्याने टोलवणे गरजेचे आहे. त्याच्याकडे दिग्गज खेळाडूंची सारखी क्षमता आहे. जुन्या पिढीतील खेळाडूंमध्ये असलेली मजबूत मानसिकता, जर त्याने आत्मसात केली तर गिल यशस्वी फलंदाज बनू शकतो, असे सेहवाग म्हणाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

Romi Konkani: रोमी कोंकणी, मराठी वादावर दत्ता नायकांचे मोठे विधान! पहा...

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण! देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT