IPL 2021: MI beat Punjab Kings by 6 Wickets. Hardik Pandya is back in form Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2021: हार्दिकमुळे मुंबईच्या प्लेऑफच्या आशा जिवंत

IPL 2021 च्या थरारक सामन्यात पंजाब किंग्जल हरवत ओपल IPL 2021 मध्ये शानदार पुनरागमन केले.

दैनिक गोमन्तक

सौरभ तिवारीच्या Saurabh Tiwary) तुफान खेळीनंतर, आणि शेवटच्या षटकात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कायरन पोलार्डच्या Kieron Pollard) एंडच्या मदतीने, मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) मंगळवारी IPL 2021 च्या थरारक सामन्यात पंजाब किंग्जल (Punjab Kings) हरवत ओपल IPL 2021 मध्ये शानदार पुनरागमन केले. पंजाब विरुद्धच्या सामन्यात सहा विकेटने विजय मिळवत MI थेट पाचव्या स्थानावर पोहोचली आहे . प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबला मुंबईच्या गोलंदाजांनी आपल्या थेट गोलंदाजीने दबावात ठेवले.आणि याचमुळे पंजाबला निर्धारित 20 षटकांत सहा गडी गमावून केवळ 135 धावा करता आल्या.(IPL 2021: MI beat Punjab Kings by 6 Wickets. Hardik Pandya is back in form)

Points Table

हे लक्ष सोपे वाटत असले तरी हे गाठताना MIची दमछाक झालेली पाहायला मिळाली. कारण चांगली सुरुवात न मिळाल्याने मुंबईला हे लक्ष गाठणे अवघड वाटत होते. कारण मुंबईच्या ओपेनर्सनिओ म्हणावी तशी कामगिरी नाही केली पण तरीही बऱ्याच सामन्यानंतर हा सामना जिंकत मुंबईचा संघ आता गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आला आहे.संघाने 11 सामन्यांत पाच विजय आणि सहा पराभव मिळवले आहेत.

छोट्या लक्ष्यापुढे देखील मुंबईची सुरुवात खराब झाली. टीमने आपला कर्णधार लवकर गमावला. आठ धावा करणारा रोहित संघाच्या 16 धावांवर रवी बिष्णोईचा बळी ठरला. रविने पुढच्या चेंडूवर सूर्यकुमार यादवला बोल्ड केले. यावेळी संघाला क्विंटन डी कॉकची सर्वात जास्त गरज होती पण मोहम्मद शमीने त्याला तंबूत परत पाठवले. डी कॉकने 27 धावांची खेळी खेळली. आणि इथे मुंबई संकटात सापडली.मात्र हार्दिकने जोरदार खेळी करत आपला फॉर्म टिकून असल्याचे दाखवले आणि सहा पराभवांनंतर MI ने सामना जिंकला.

सौरभ तिवारीची विकेट गेल्यांनतर मुंबईवर पुन्हा संकट उभे राहिले पण या संघातील दोन महान खेळाडू मैदानावर उपस्थित होते - हार्दिक पंड्या आणि कायरन पोलार्ड. या दोघांनीही आपापल्या शैलीत फलंदाजी करताना मुंबईला विजय मिळवून दिला. गरज पडल्यावर दोघांनी शेवटी मोठे फटके खेळले. पंड्याने 30 चेंडूत 40 धावा केल्या. त्याचवेळी पोलार्डने सात चेंडूत 15 धावा केल्या. पंड्याने चार चौकार आणि दोन षटकार ठोकले. पोलार्डने एक चौकार आणि एक षटकार ठोकला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईकडून कायरन पोलार्ड आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी दोन तर कुणाल पंड्या आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. पंजाबचा सलामीवीर कर्णधार राहुल आणि मनदीप सिंगने संघाला चांगली दिली होती.दोघांनी पहिल्या विकेटसाठी 36 धावांची भागीदारी केली.मात्र कुणाल ने आपल्या फिरकीने ही भागीदारी तोडली. मनदीपने 14 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 15 धावा केल्या. थोड्याच वेळात, तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेला ख्रिस गेल अवघ्या एका धावेने बाद झाला. गेलला त्याचाच सहकारी पोलार्डने बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. कर्णधार राहुल चांगल्या लयमध्ये दिसत होता पण तोही फार काळ टिकू शकला नाही आणि 22 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 21 धावांवर बाद झाला. पोलार्डने राहुलची देखील विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सायंकाळी गोव्याचा एक मूड असतो! त्यांना जास्त वेळ थांबवणं योग्य नाही; भाषण उरकत घेत अमित शहांची मिश्किल टिप्पणी

Amit Shah In Goa: "2047 पर्यंत वाट पाहायची गरज नाही, 2037 पर्यंत गोवा 'विकसित राज्य' बनेल", गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

Rohit Sharma Captaincy: 'राजकीय' खेळात 'हिटमॅन' रोहितची विकेट! टीम इंडियावर गंभीर आरोप, चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी

अमित शहांच्या हस्ते 'म्हजे घर योजने'चा भव्य शुभारंभ! CM सावंतांनी दिली '6 महिन्यांत नोंदणी'ची ग्वाही

ओपा प्रकल्पातील दुरुस्ती पूर्णत्वाकडे; पणजीला 11 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता!

SCROLL FOR NEXT