Commonwealth Games 2022 Dainik Gomantak
क्रीडा

Commonwealth Games 2022: कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय तुकडी जाहीर, 215 खेळाडू जाणार बर्मिंगहॅमला

CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्स 28 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत बर्मिंगहॅम, यूके येथे होणार आहेत.

दैनिक गोमन्तक

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) ने 28 जुलैपासून बर्मिंगहॅम येथे सुरू होणाऱ्या राष्ट्रकुल खेळांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात एकूण 322 सदस्य असणार आहेत. यामध्ये 215 खेळाडू आणि 107 अधिकारी आणि सपोर्ट स्टाफ यांचा समावेश असणार आहे. (Commonwealth Games 2022 News)

बर्मिंगहॅमला जाणार्‍या भारतीय तुकडीची घोषणा करताना IOA सरचिटणीस राजीव मेहता म्हणाले, “आम्ही आमची सर्वात मजबूत तुकडी राष्ट्रकुल खेळांसाठी पाठवत आहोत. नेमबाजीत आम्ही नेहमीच खूप मजबूत होतो. पण यावेळी हा कार्यक्रम या खेळांचा भाग नाही. असे असूनही, गेल्यावेळेच्या तुलनेत यंदा चांगली कामगिरी करण्याचा आम्हाला विश्वास आहे. गेल्या वेळी गोल्ड कोस्टमध्ये राष्ट्रकुल स्पर्धा पार पडल्या होत्या. येथे भारत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडनंतर गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.

* ऑलिम्पिक पदक विजेते देखील भारतीय तुकडीचा भाग आहेत
राष्ट्रकुल स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय तुकडीमध्ये ऑलिम्पिक पदक विजेते नीरज चोप्रा (Niraj Chopra , पीव्ही सिंधू(P V Sindhu) , मीराबाई चानू, लोव्हलिना बोरगोहेन यांसारख्या मोठ्या चेहऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत बजरंग पुनिया, रवी कुमार दहिया, मनिका बत्रा, विनेश फोगट, हिमा दास आणि अमित पंघल हे देखील या संघात आहेत. भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे (BFI) उपाध्यक्ष राजेश भंडारी यांना भारतीय संघाचे संघप्रमुख बनवण्यात आले आहे.

* भारतीय खेळाडू 15 खेळांमध्ये सहभागी होतील

भारतीय खेळाडू यावेळी 15 खेळ आणि चार पॅरा स्पोर्ट्समध्ये भाग घेणार आहेत. बॉक्सिंग, बॅडमिंटन, वेटलिफ्टिंग आणि कुस्तीमध्ये संघाला आणखी पदके मिळण्याची अपेक्षा आहे. हॉकी आणि महिला क्रिकेटमध्येही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेज अधिकृतपणे 23 जुलै रोजी उघडेल. भारतीय संघ येथे पाच वेगवेगळ्या ठिकाणी असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT