Aman Sehrawat X/Media_SAI
क्रीडा

Zagreb Open: भारताच्या अमनची झाग्रेबमध्ये सुवर्णमय कामगिरी! फायनलमध्ये चीनच्या कुस्तीपटूला लोळवले

Aman Sehrawat: झाग्रेब ओपन रँकिंग सिरिज स्पर्धेत भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावतने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.

Pranali Kodre

Indian wrestler Aman Sehrawat won gold medal in the Zagreb Open Ranking Series:

झाग्रेब ओपन रँकिंग सिरिज स्पर्धेत भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावतने सुवर्णमय कामगिरी केली आहे. त्याने जागतिक क्रमवारीत 7 व्या क्रमांकावरील चीनचा कुस्तीपटू वानहाओ जू याला 10-0 असा फरकाने पराभूत करत सुवर्णपदक आपल्या नावावर केले.

अमनने तांत्रिकरित्या वर्चस्व गाजवत हा विजय मिळवला. त्यामुळे सध्या वादात अडकलेल्या भारतीय कुस्तीसाठी हा एक आनंदाचा क्षण ठरला आहे.

दरम्यान, अमनला सुवर्णपदकानंतरही भारतीय तिरंग्यासह सेलिब्रेशन करता आले नाही, कारण सध्या भारतीय कुस्तीपटू युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या बॅनरखाली खेळत आहेत. कारण जागतिक कुस्ती संघटनेने भारतीय कुस्ती संघटनेवर निवडणूका वेळेत न घेतल्याप्रकरणी बंदी घातली आहे.

अमनसाठी हा मोठा विजय आहे. यापूर्वी त्याने 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 57 किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली होती.

अमनने झाग्रेब येथील स्पर्धेत तुर्कीच्या मोहम्मद कारावुसविरुद्ध 15-4 ने विजय मिळवत विजयी सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने अमेरिकेच्या रिचर्ड्स झेन राय ऱ्होड्सविरुद्ध तांत्रिकरित्या वर्चस्व छेवत 11-0 असा विजय मिळवत उपांत्य फेरीत जागा मिळलली होती.

त्यानंतर त्याने उपांत्य फेरीत जॉर्जियाच्या रॉबर्टी डिंगशविलीविरुद्ध 11-0 असा विजय मिळलला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला.

दिपक पुनिया बाहेर

आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा दिपक पुनियाते झाग्रेब ओपन रँकिंग सिरिज स्पर्धेत आव्हान संपले आहे. त्याला 86 किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या अजामत दौलेतबेकोवविरुद्ध पहिल्याच सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता.

रेपेचेज राऊंडमध्ये दिपकने एक विजय मिळवला, तर दुसरा पराभूत झाला. त्यामुळे त्याच्या पदक जिंकण्याचा आशाही मावळल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT