Indian Women's League Dainik Gomantak
क्रीडा

इंडियन वूमन्स लीग फुटबॉल स्पर्धा; शिरवडे क्लबने नोंदविला पहिला विजय

संध्या कच्छपच्या गोलमुळे एसएसबीने साधली बरोबरी

दैनिक गोमन्तक

पणजी: इंडियन वूमन्स लीग फुटबॉल स्पर्धेत पाच पराभव आणि एक बरोबरी अशी निराशाजनक कामगिरी केलेल्या गोव्याच्या शिरवडे स्पोर्टस क्लबने अखेर पहिला विजय नोंदविला. त्यांनी पश्चिम बंगालच्या एसएसबी वूमन स्पोर्टस क्लबला 2 - 1 फरकाने हरविले. सामना भुवनेश्वर येथील 7 बटालियन मैदानावर झाला. (Indian Women's League football tournament; Shirwade Club recorded its first victory )

सन्फिदा नोंगरुम हिने 32 व्या मिनिटास शिरवडे क्लबला आघाडी मिळवून दिली. नंतर 60 व्या मिनिटास संध्या कच्छप हिच्या गोलमुळे एसएसबी संघाने बरोबरी साधली. लगेच 62 व्या मिनिटास अर्पिता पेडणेकर हिने केलेल्या गोलमुळे शिरवडे क्लबने पुन्हा आघाडी प्राप्त केली व ती शेवटपर्यंत टिकविली. शिरवडे क्लबचे या विजयामुळे सात लढतीनंतर चार गुण झाले आहेत. एसएसबी संघाचे चौथ्या पराभवामुळे सात लढतीनंतर नऊ गुण कायम राहिले. त्यांचा हा सलग तिसरा पराभव ठरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT