ATK Mohan Bagan

 

Dainik Gomantak 

क्रीडा

Indian Super League: एफसी गोवाचे माजी प्रशिक्षक एटीके मोहन बागानच्या डग-आऊटमध्ये

एफसी गोवा संघाला सहा सामने मार्गदर्शन केल्यानंतर हुआन फेरांडो (Juan Ferrando) एटीके मोहन बागानच्या डग-आऊटमध्ये दाखल झाले.

किशोर पेटकर

पणजी : इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेच्या आठव्या मोसमात एफसी गोवा संघाला सहा सामने मार्गदर्शन केल्यानंतर हुआन फेरांडो (Juan Ferrando) एटीके मोहन बागानच्या डग-आऊटमध्ये दाखल झाले. बुधवारी फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर उभय संघांतील लढतीत चाळीस वर्षीय स्पॅनिश प्रशिक्षकांवरच जास्त लक्ष असेल.

फेरांडो यांच्या मार्गदर्शनाखाली एटीके मोहन बागानने (ATK Mohan Bagan) नॉर्थईस्ट युनायटेडवर 3-2 असा संघर्षमय विजय नोंदविला, तर एफसी गोवाने नवे प्रशिक्षक डेरिक परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली एका गुणाची कमाई करताना ओडिशा एफसीला 1-1 असे गोलबरोबरीत रोखले. आपल्या जुन्या संघाविरुद्ध बुधवारी फेरांडो कोणती व्यूहरचना करतात याबाबत फुटबॉलप्रेमींना उत्सुकता असेल. सध्या एटीके मोहन बागानचे 11, तर एफसी गोवाचे आठ गुण आहेत.

आक्रमक शैलीनेच खेळू : डेरिक

एफसी गोवा संघ यापुढेही आक्रमक शैलीतच खेळेल, असे डेरिक यांनी मंगळवारी ठासून सांगितले. रेड कार्डमुळे दोन सामन्यांचे निलंबन संपवून स्पॅनिश खेळाडू होर्गे ओर्तिझ बुधवारच्या सामन्यात निवडीसाठी उपलब्ध असेल, त्यामुळे एफसी गोवाचे आक्रमण आणखीनच धारदार होईल. मात्र आणखी एक स्पॅनिश खेळाडू ऐरान काब्रेरा याचे स्नायू दुखावले असल्याने तो एफसी गोवातर्फे उर्वरित मोसम खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

बुमूस, लिस्टनचा धोका

यापूर्वी एफसी गोवातर्फे खेळलेले एटीके मोहन बागानचे ह्युगो बुमूस आणि लिस्टन कुलासो यांनी मोसमात चांगला फॉर्म प्रदर्शित केला आहे. बुमूसने सात सामन्यात पाच गोल केले असून तेवढेच सामने खेळलेल्या गोमंतकीय लिस्टनने चार गोल केले आहेत. एफसी गोवाच्या बचावळीस या दोघांचा धोका असेल.

``जुन्या संघाविरुद्ध आताच्या संघाची तयार करताना अनुभव चमत्कारिक असतो. माझी काही प्रमाणात गोंधळलेली अवस्था आहे, संमिश्र भावना आहेत. तरीही मी पूर्णतः व्यावसायिक आहे आणि सामना जिंकण्यासाठीच माझे सर्वोत्तम प्रयत्न असतील.``

- हुआन फेरांडो,

प्रशिक्षक एटीके मोहन बागान

मैदानात उतरण्यापूर्वी...

- एटीके मोहन बागानचे 7 सामने, 3 विजय, 2 बरोबरी, 2 पराभव, 11 गुण

- एफसी गोवाचे 7 सामने, 2 विजय, 2 बरोबरी, 3 पराभव, 8 गुण

- एटीके मोहन बागानचे 16, तर एफसी गोवाचे 10 गोल

- दोन्ही संघांचा बचाव कमजोर, प्रतिस्पर्ध्यांचे एटीके मोहन बागानवर 15, तर एफसी गोवावर 14 गोल

- 2020-21 मोसमात 2 लढती, एटीके मोहन बागानचा 1 विजय

- 16 डिसेंबर 2020 रोजी फातोर्डा येथे एटीके मोहन बागान 1-0 फरकाने विजयी

- 17 जानेवारी 2021 रोजी फातोर्डा येथे 1-1 गोलबरोबरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT