क्रीडा

Indian Super League: ईस्ट बंगालने रोखल्याने हैदराबादला दोन गुणांचा फटका

कोलकात्याच्या (Kolkata) संघाने 1-1 गोलबरोबरीत रोखल्यामुळे हैदराबादच्या संघाच्या गुणसंख्येवर मर्यादा आल्या, तसेच दोन गुणांचा फटकाही बसला.

किशोर पेटकर

पणजी: हैदराबाद एफसीने ईस्ट बंगालला नमविले असते, तर इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेत सध्या अग्रस्थानी असलेल्या मुंबई सिटी व त्यांच्यातील गुणफरक फक्त एका गुणावर आला असता, पण गुरुवारी बांबोळी येथील ॲथलेटिक्स स्टेडियमवर तसे घडले नाही. कोलकात्याच्या संघाने 1-1 गोलबरोबरीत रोखल्यामुळे हैदराबादच्या संघाच्या गुणसंख्येवर मर्यादा आल्या, तसेच दोन गुणांचा फटकाही बसला.

स्लोव्हेनियन खेळाडू अमीर डेर्व्हिसेविच याने विसाव्या मिनिटास थेट फ्रीकिक फटक्यावर ईस्ट बंगालला आघाडी मिळवून दिली. नंतर 35व्या मिनिटास नायजेरियन आघाडीपटू बार्थोलोम्यू ओगबेचे याने मोसमातील सहावा गोल नोंदविल्यामुळे हैदराबादला बरोबरी साधता आली. अनिकेत जाधवच्या क्रॉसपासवर त्याचे हेडिंग अचूक ठरले. ओगबेचे याने आता गोल्डन बूटच्या शर्यतीत पुढे राहताना मुंबई सिटीचा इगोर आंगुलो व एटीके मोहन बागानचा ह्युगो बुमूस याने एका गोलने मागे टाकले आहे.

बरोबरीचा एक गुण मिळाल्यामुळे हैदराबादचे आता सात लढतीतून 12 गुण झाले आहेत. त्यांची ही एकंदरीत तिसरी व सलग दुसरी बरोबरी ठरली. जमशेदपूर व केरळा ब्लास्टर्स संघाचेही 12 गुण आहेत, मात्र गोलसरासरी सरस असल्याने हैदराबाद संघ आता दुसऱ्या स्थानी आहे, तर पहिल्या क्रमांकावरील मुंबई सिटीचे 15 गुण आहेत. सलग आठव्या लढतीत ईस्ट बंगाल संघ विजयाविना राहिला. त्यांची ही चौथी बरोबरी असून चार गुणांसह शेवटच्या अकराव्या क्रमांकात फरक पडलेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT