Team India Dainik Gomantak
क्रीडा

दक्षिण आफ्रिकेच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, रोहित आणि कोहलीला विश्रांती

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 जूनपासून सुरु होणार्‍या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी BCCI ने रविवारी (India vs South Africa, T20I) भारतीय संघाची घोषणा केली.

दैनिक गोमन्तक

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 जूनपासून सुरु होणार्‍या पाच सामन्यांच्या T20 मालिकेसाठी BCCI ने रविवारी ( India vs South Africa, T20I) भारतीय संघाची घोषणा केली. टी-20 मालिकेव्यतिरिक्त इंग्लंड दौऱ्यावर होणाऱ्या कसोटी सामन्यासाठीही भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. टी-20 मालिकेसाठी केएल राहुलकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे.

दरम्यान, भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) 9 जून रोजी दिल्लीत (Delhi) पहिला टी-20 सामना, दुसरा 12 जून रोजी कटकमध्ये, तिसरा सामना 14 जून रोजी विशाखापट्टणममध्ये, चौथा 17 जून रोजी राजकोटमध्ये आणि पाचवा आणि अंतिम टी-20 सामना बेंगळुरुमध्ये खेळायचा आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20I मालिकेसाठी भारतीय संघ: केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.

शिवाय, दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेसाठी संघ निवडण्यासोबतच निवडकर्त्यांनी इंग्लंड (England) दौऱ्यावर होणाऱ्या कसोटी सामन्यासाठीही संघाची घोषणा केली आहे. गेल्या वर्षीच ही कसोटी खेळवली जाणार होती, परंतु कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली. दोन्ही संघांमधील हा कसोटी सामना 1 ते 5 जुलै दरम्यान बर्मिंगहॅममध्ये खेळवला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Chapoli Dam: चापोली धरण तुडुंब भरले! काणकोणवासीयांचा पाण्याचा प्रश्न सुटला; गोमंतकीयांमध्ये समाधानाचे वातावरण

EPFO New Claim Rules: नोकरदार वर्गासाठी आनंदवार्ता! आता 48 तासांत PF क्लेम होणार मंजूर, AI तंत्रज्ञानामुळे प्रक्रिया वेगवान

खरी कुजबूज: विजेच्या धक्क्यापेक्षाही धास्ती राजकीय धक्क्याची

VIDEO: 'मी नसलो तरी भारताकडे...', सिल्वर मेडल जिंकल्यानंतर नीरज चोप्राचं मोठं वक्तव्य; यशवीर सिंगच्या कामगिरीचं केलं कौतुक

Babush Monserrate Santa Cruz Office: सांताक्रूझमध्ये उभारणार मोन्सेरातांचे नवे कार्यालय; भाजपचा उमेदवार निवडून आणण्याचे ध्येय

SCROLL FOR NEXT