Indian National Basketball League Dainik Gomantak
क्रीडा

इंडियन नॅशनल बास्केटबॉल लीगमध्ये पोस्ट अप्स, डेक्कन जिमखाना, जंपशॉट हूपर्सचे विजय

आयएनबीएल बास्केटबॉल : नागपूर, मुझफ्फरपूर, वायएमसीए, फातोर्डा संघाचेही वर्चस्व

दैनिक गोमन्तक

पणजी : इंडियन नॅशनल बास्केटबॉल लीग (आयएनबीएल) 3 बाय 3 स्पर्धेत महिला गटात पोस्ट अप्स, डेक्कन जिमखाना, जंपशॉट हूपर्स संघाने चमकदार विजय नोंदविले. स्पर्धा येथील डॉन बॉस्को ओरेटरी इनडोअर बास्केटबॉल कोर्टवर सुरू आहे. (Indian National Basketball League updates)

पुरुष गटात नागपूर गॅलंट्स संघाने कोर्ट व्हिजन पुणे संघावर 16-8 असा, मुझफ्फरपूर बॉलर्सने पिस्टन्सवर 7-0 असा, वायएमसीए टायटन्सने कॅगर्सवर 10-8 असा, तर डीबीओ फातोर्डा संघाने गोवा गोवा संघावर 14-12 असा विजय नोंदविला.

महिला गटातील लढतीत पोस्ट अप्स संघाने हॉट शॉट्सवर 21-9 असा, डेक्कन जिमखान्याने वाईल्ड विंग्ज बॉलर्सवर 18-10 असा, तर जंपशॉट हूपर्सने इन्फर्नो संघावर 10-3 असा विजय मिळविला.

पुरुषांच्या फ गटात शिवोली संघाने यूबीए संघावर 15-9, डेक्कन बॉईजने जीटी 30 संघावर 19-13, लुर्दिश संघाने एबीडी बॉईजवर 12-6, तर अँड 1 संघाने एमएलटीबी संघावर 20-7 फरकाने विजय प्राप्त केला.

पुरुषांच्या 18 वर्षांखालील गटात वारणा हूप्सने चुरशीच्या लढतीत बीएससी संघावर 11-10 अशी अवघ्या एका गुणफरकाने मात केली. या वयोगटातील महिला गटात वाईल्ड विंग बॉलर्सने के क्रू संघावर 20-8 असा, तर जंपशॉट हूपर्सने इन्फीनाईट्सवर 16-3 फरकाने विजय नोंदविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

कारवर 3400 Kiss अन् VIDEO व्हायरल! गर्लफ्रेंडचा 'किसिंग स्टंट' पठ्ठ्याला पडला महागात; पोलिसांनी कार धुवायला लावून ठोठावला 5500 रुपयांचा दंड

SCROLL FOR NEXT