Paul Valthaty Dainik Gomantak
क्रीडा

Cricketer Retirement: IPL मध्ये वन सिजन वंडर ठरलेल्या या भारतीय क्रिकेटरची निवृत्ती; CSK विरुद्ध ठोकलेलं शतक

Cricketer Retirement: आयपीएल 2011 चा हंगाम गाजवणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने निवृत्ती जाहीर केली आहे.

Pranali Kodre

Paul Valthaty Retirement: इंडियन प्रीमियर लीगमध्ये एका रात्रीत स्टार झालेले अनेक खेळाडू आहेत. पण यातील काही खेळाडू विस्मरणातही गेले, जे वन सिजन वंडर ठरले. असाच एक खेळाडू म्हणजे मुंबईचा पॉल वॉल्थटी. किंग्स इलेव्हन पंजाबकडून (पंजाब किंग्स) 2011 आयपीएल गाजवलेल्या वॉल्थटीने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

39 वर्षीय वॉल्थटीने मुंबई क्रिकेट असोसिएशनला मेल करत त्याच्या निवृत्तीची माहिती दिली आहे. त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) आभार मानले आहेत. त्याचबरोबर आयपीएलमध्ये त्याने प्रतिनिधित्व केलेल्या राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स संघाचेही आभार मानले आहेत.

वॉल्थटीने 2009 मध्ये आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण केले होते, पण त्याला 2 सामनेच खेळण्याची संधी मिळाली. 2010 मध्ये तो एकही सामना खेळला नाही. पण 2011 चा हंगाम त्याच्यासाठी शानदार ठरला.

पंजाब किंग्सने त्याच्यावर पूर्ण विश्वास दाखवताना 14 सामन्यात त्याला खेळवले. त्याने या 14 सामन्यांमध्ये 136.98 च्या स्ट्राईक रेटने 463 धावा केल्या होत्या. यात त्याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध केलेल्या 120 धावांच्या खेळीचाही समावेश आहे.

पण नंतर त्याला फारशी संधी मिळाली नाही आणि ते 2013 मध्ये अखेरचा आयपीएल सामना खेळला. दरम्यान 2011 आयपीएल नंतरही दुखापतींमुळे त्याला कारकिर्दीत संघर्ष करावा लागला.

डोळ्याला झालेली दुखापत

वॉल्थटी 2002 साली झालेल्या 19 वर्षांखालील वर्ल्डकपमध्येही भारताकडून खेळलेला, पण त्या स्पर्धेत बांगलादेशच्या गोलंदाजाने टाकलेल्या आखुड टप्प्याचा चेंडू त्याच्या डोळ्याला लागला होता. त्यातून सावरायला त्याला काही वर्षे जाऊन द्यावी लागली.

नंतरही त्याला त्याच्या कारकिर्दीत काही दुखापतींचा सामना करावा लागला. सध्या वॉल्थटी युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्यात त्याचे योगदान देत आहे.

वॉल्थटीची कारकिर्द

पॉल वॉल्थटीने त्याच्या कारकिर्दीत 5 प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यात त्याला एका अर्धशतकासह 120 धावा करता आल्या. तसेच लिस्ट ए क्रिकेटमध्ये 4 सामने त्याने खेळले असून 74 धावा केल्या आहेत.

त्याने त्याच्या कारकिर्दीत 34 टी20 सामनेही खेळले. ज्यात त्याने 1 शतक आणि 3 अर्धशतकांसह 778 धावा केल्या. तसेच 11 विकेट्सही घेतल्या. या 34 टी20 सामन्यांमध्ये 23 आयपीएल सामन्यांचा समावेश आहे. त्याने 23 आयपीएल सामन्यांमध्ये एका शतकासह 505 धावा केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Vaping Controversy: ''चहलला जेलमध्ये टाका''! ई-सिगरेट प्रकरणावरुन माजी क्रिकेटपटू कडाडले; बीसीसीआयच्या मवाळ भूमिकेवर उपस्थित केला सवाल

अन्ननलिका जळाली, पाण्यासाठी तरसली, 8 महिने मृत्यूशी दिली झुंज! कोल्ड ड्रिंक समजून तरुणीनं प्यायलं ॲसिड; अखेर डॉक्टरांनी 'असं' वाचवलं

Ravi Yog 2026: अविवाहितांसाठी सनई-चौघड्याचे योग, स्वप्नातील गाडी आणि घराचे स्वप्न होणार पूर्ण; 'रवि योग' ठरणार वरदान

Goa Tiger Death: निसर्गाचा रक्षणकर्ताच धोक्यात! मानवाच्या क्रूरतेमुळे वाघांचा जीव टांगणीला; पूर्वजांनी पुजलेला 'व्याघ्रदेव' रक्ताळला

Fake ED Officer Scam: तोतया ईडी प्रकरणातील मास्टरमाईंड बलरामची पोलिसांना हुलकावणी, हायकोर्टानं फेटाळला जामीन

SCROLL FOR NEXT