भारतीय संघ (Indian Team) 2023 मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. Dainik Gomantak
क्रीडा

मौका..मौका.. भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार?

आशियाई क्रिकेट (Asian cricket) परिषदेच्या बैठकीत 2023 मध्ये पाकिस्तानला (Pakistan) एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेच्या (Asia Cup) आयोजनाची जबाबदारी मिळाली आहे. तसेच 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाचे भारतात (India) आयोजन होणार आहे.

दैनिक गोमन्तक

भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) या दोन्ही संघात राजकीय कारणास्तव बऱ्याच काळापासून एकमेकांच्या देशात खेळण्यास जात नाहीत. भारतीय संघाने 2008 साली पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यानंतर आता भारतीय संघ (Indian Team) 2023 मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे.

नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत 2023 मध्ये पाकिस्तानला एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी मिळाली आहे. तसेच 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाचे भारतात आयोजन होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ त्यावेळी भारतात खेळण्यास येईल. भारत विरुध्द पाकिस्तान यांच्यात 24 ऑक्टोबरला दुबईत टी-20 विश्वचषक स्पर्धेत लढत होणार आहे.

पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये आशिया चषक स्पर्धेचे आयोजन श्रीलंकेत करण्यात आले आहे. ही स्पर्धा टी- 20 प्रकारात होणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पीसीबी आणि बीसीसीआय यांच्याकडून याबाबत पुष्टी देखील मिळाली आहे. त्यामुळे याचे वेळापत्रक लवकरच जाहिर करण्यात येणार आहे. या बैठकीला पीसीबीचे अध्यक्ष रमीज राजा उपस्थित होते.

इंग्लंड आणि न्यूझीलंड संघांनी नुकताच पाकिस्तानचा दौरा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द केला होता. 2008 नंतर आशिया चषक खेळण्यास भारतीय पाकिस्तानात गेलेला नाही. 2008 मध्ये देखील या चषकाचे दोनच सामने पाकिस्तानात झाले होते. त्यात एका सामन्यात भारताला विजय मिळाला तर एक सामना पाकिस्तानने जिंकला. पाकिस्तानात झालेल्या दोन्ही संघाच्या एकदिवसीय लढतीमध्ये आतापर्यंत पाकिस्तान भारतापेक्षा वरचढ राहिला आहे. या दोन संघात एकूण 27 एकदिवसीय सामने खेळविण्यात आले आहेत. त्यात भारतीय संघाने 11 तर पाकिस्तानने 14 सामने जिंकले आहेत. तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे. क्रिकेटच्या तीनही प्रकारात या दोन्ही संघात आतापर्यंत 53 सामने झाले असून, त्यातील 13 सामन्यात भारताला, तर 21 सामन्यात पाकिस्तानला विजय मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Road Accident: 'काळापुढे कुणाचे चालत नाही?' अकाली मृत्यूंच्या मालिकेनं हादरला 'गोवा'!

Lucky Zodiac Signs: निर्जला एकादशीला जुळून येतोय 'द्विद्वादश' आणि 'नवपंचम' योग, 'या' 4 राशींच्या नशिबात होणार सुवर्णबदल; गुंतवणुकीतून होणार पैशांचा पाऊस

Nuvem Apartment Project: 400 मीटर जागेत 8 फ्लॅट्स कसे? नुवेतील नागरिकांचा प्रशासनाला संतप्त सवाल, कचरा, पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर; लवकरच कारवाई?

Konkani Language: गोव्यातूनच कोकणी हद्दपार होण्याच्या मार्गावर? CM सावंतांनी व्यक्त केली खंत: म्हणाले, "60 टक्के घरांतून कोकणी गायब...!"

8th Pay Commission पूर्वी मोदी सरकारचा महाधमाका! 'या' कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू; कोण आहेत मानकरी?

SCROLL FOR NEXT