Kapil Dev Love Story Dainik Gomantak
क्रीडा

Kapil Dev Love Story: सारिकाबरोबर ब्रेकअप ते रोमीला फिल्मी स्टाईल प्रपोजल; कशी होती कपिल देव यांची लव्हस्टोरी, वाचा

कपिल देव यांची लव्हस्टोरी कशी होती, घ्या जाणून.

Pranali Kodre

Kapil Dev Love Story: भारताचे महान कर्णधारांबद्दल जेव्हाही चर्चा होते, त्यावेळी एमएस धोनी, सौरव गांगुली यांच्याबरोबरच कपिल देव यांचेही नाव घेतले जाते. 6 जानेवारी 1959 रोजी जन्मलेल्या कपिल देव यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदा विश्वविजेता झाला होता. त्यामुळे कपिल भारताचे पहिले विश्वविजेते कर्णधार ठरले.

त्यांना जगातील अष्टपैलू क्रिकेटपटूंमध्येही गणले जाते. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात त्यांनी भारताकडून प्रभावी कामगिरी करताना दिग्गज खेळाडूंमध्ये जागा मिळवली. त्यांच्या मैदानातील अशा अनेक विक्रमांबद्दल नेहमीच चर्चा होते. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी माहिती अनेकांना नाही. तर आज आपण त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेऊ.

सारिकाबरोबर अफेअरच्या चर्चा

अनेक क्रिकेटपटूंच्या ज्याप्रकारे अफेअरच्या चर्चा होतात, तशी चर्चा कपिल देव यांच्याबाबतीतही झाली. भारतीय संघात युवा क्रिकेटपटू म्हणून सामील झालेल्या कपिल देव यांचेही दाक्षिणात्य अभिनेत्री सारिकाबरोबर अफेअरच्या बऱ्याच चर्चा झाल्या होत्या. अगदी ते लग्न करणार होते, असंही म्हटले गेले.

रिपोर्ट्सनुसार कपिल देव आणि सारिका दोघेही सिंगल असताना त्यांना मनोज कुमार यांनी भेटवले होते. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि त्यांच्यातील नाते मैत्रीच्या पलिकडे गेले. पण काही दिवसांनी हे दोघेही वेगळे झाले. पण त्यांनी कधीही त्यांच्या वेगळे होण्याचे कारण स्पष्ट केले नाही.

पण, त्यावेळी असे म्हटले गेले की कपिल देव त्यावेळी रोमी भाटिया हिच्या प्रेमात पडले होते. याच कारणामुळे सारिका आणि ते वेगळे झाले. विशेष म्हणजे पुढे जाऊन कपिल यांनी रोमीबरोबरच लग्न गाठ बांधली. पुढे जाऊन सारिकानेही अभिनेते कमल हसन यांच्याबरोबर लग्न केले होते.

मित्रामुळे झाली रोमी यांची ओळख

कपिल यांची रोमी यांच्याबरोबर त्यांचा मित्र सुनील भाटियामुळे ओळख झाली होती. त्यावेळी रोमी यांच्या सौंदर्याने कपिल यांना भुरळ घातली. त्यांनतर कपिल यांनी 1979 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यासाठी रोमी यांना आमंत्रणही दिले होते.

हे आमंत्रण रोमी यांनी स्विकारले. विशेष म्हणजे त्या सामन्यात कपिल देव यांनी त्यांचे पहिले शतक झळकावले होते. त्यादिवशी केवळ रोमी यांनाच नाही, तर जगभरातील अनेकांना कपिल यांच्या त्या खेळीने प्रभावित केले.

फिल्मी स्टाईल प्रपोजल

दरम्यान, रोमी यांच्याशी त्यांची मैत्री वाढली. कपिल यांनी त्यांच्या एका पुस्तकात त्यांनी रोमी यांना लग्नाची मागणी कशी घातली, याबद्दल सांगितले आहे. अगदी फिल्मी स्टाईलने त्यांनी लग्नाची मागणी घातली होती.

झाले असे की रोमी आणि कपिल एकदा ट्रेनने प्रवास करत होते. त्यावेळी त्यांना त्यांचा फोटो असलेल्या एका जाहिरातीचे होर्डिंग दिसले. तेव्हा त्यांनी रोमी यांना तो फोटो काढण्यास सांगितला आणि त्यांना विचारले की 'तुला या सुंदर जागेचा फोटो काढायला आवडेल का? आपण हा फोटो भविष्यात आपल्या मुलांना दाखवू.'

हे एकून रोमी या थोड्या चकीत झाल्या, पण त्यांनी कपिल यांची ही मागणी स्विकारली. त्यानंतर 1980 मध्ये या दोघांनीही लग्न केले. आजही हे दोघेही सुखाने संसार करत असून त्यांना एक मुलगीही आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT