Virat Kohli BCCI
क्रीडा

World Cup 2023: भारताचा सलग पाचवा विजय! विराटचं शतक हुकलं पण, 20 वर्षांनंतर न्यूझीलंडला पाजलं पराभवाचं पाणी

India vs New Zealand: भारताने तब्बल २० वर्षांनंतर न्यूझीलंडला वनडे वर्ल्डकपमध्ये पराभवाचा धक्का दिला आहे.

Pranali Kodre

India won by 4 Wickets against New Zealand in ICC ODI Cricket World Cup 2023:

रविवारी (22 ऑक्टोबर) वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सामना पार पडला. धरमशालामधील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने 4 विकेट्सने विजय मिळवला. हा भारतीय संघाचा या स्पर्धेतील सलग पाचवा विजय ठरला. दरम्यान, न्यूझीलंड संघाचा विजयी रथ मात्र रोखला गेला.

या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर 274 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 48 षटकात 6 विकेट्स गमावत पूर्ण केला. भारताकडून विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली.

दरम्यान, भारताचा हा न्यूझीलंडविरुद्ध 2003 नंतर वनडे किंवा टी20 क्रिकेट प्रकारातील आयसीसी स्पर्धांमधील पहिला विजय ठरला आहे. याआधी 20 वर्षांपूर्वी 2003 मध्ये भारताने न्यूझीलंडला पराभूत केले होते.

मात्र, त्यानंतर आयसीसीच्या वनडे किंवा टी20 प्रकारात भारताला न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवता आला नव्हता. पण अखेर हा पराभवाचा दुष्काळ अखेर संपला.

भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी 274 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शानदार सुरुवात केली होती. त्यांनी अर्धशतकी भागीदारीही केली. मात्र 46 धावांवर लॉकी फर्ग्युसनने रोहितला त्रिफळाचीत केले.

त्यानंतर फग्युसननेच गिललाही चूक करण्यात भाग पाडलं. त्यामुळे गिल मोठा फटका मारण्याच्या नादात डॅरिल मिचेलच्या हातात झेल देत बाद झाला. गिलने 26 धावांची खेळी केली.

त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने 52 धावांची भागीदारी करत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, अय्यर स्थिरावल्यानंतर 33 धावांवर ट्रेंट बोल्टविरुद्ध खेळताना बाद झाला. त्यानंतर केएल राहुलनेही विराटची साथ देण्याचा प्रयत्न करताना 54 धावांची भागीदारी केली. पण तोही चांगल्या सुरुवातीनंतर 27 धावांवर मिचेल सँटेनरच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.

त्यापाठोपाठ सूर्यकुमार यादवही विराटबरोबर योग्य ताळमेळ न राखल्याने 2 धावांवर धावबाद झाला. त्यावेळी भारताला 83 धावांची गरज होती.

मात्र, त्यानंतरही विराट कोहलीला रवींद्र जडेजाने भक्कम साथ दिली. या दोघांनी 78 धावांची भागीदारी करत भारताला विजयाच्या जवळ पोहोचवले.

मात्र, विराट 95 धावांवर असताना मोठा फटका खेळताना मॅट हेन्रीच्या हातात सहज झेल देत बाद झाला. त्यावेळी भारताला विजयासाठी अवघ्या 5 धावा हव्या होत्या. पण अखेर जडेजाने 48 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकला आणि भारताचा विजय पक्का केला.

न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या, तसेच मॅट हेन्री, मिचेल सँटेनर आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. मात्र, न्यूझीलंडची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. मोहम्मद सिराजने डेवॉन कॉनवेला शुन्यावर, तर मोहम्मद शमीने विल यंगला 17 धावांवर बाद केले.

मात्र, त्यानंतर रचिन रविंद्र आणि डॅरिल मिचेल यांनी दीडशतकी भागीदारी करत न्यूझीलंडला सावरले. या दोघांनी शानदार फलंदाजी केली. मात्र, रचिनला शमीने शुभमन गिलच्या हातून 87 चेंडूत 75 धावांवर असताना झेलबाद केले.

त्यानंतर मिचेलने शतक करत डाव सांभाळला होता, मात्र दुसऱ्या बाजूने त्याला भक्कम साथ मिळाली नाही. नंतर केवळ ग्लेन फिलिप्सला 20 धावांचा टप्पा ओलांडता आला. पण तोही 23 धावांवर बाद झाला.

अखेरच्या षटकात शतक केलेला मिचेलही 127 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकारांसह 130 धावा करून बाद झाला. अखेर 50 षटकात न्यूझीलंडने सर्वबाद 273 धावा केल्या.

भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तसेच कुलदीप यादवने 2 विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi Captain: वयाच्या 15व्या वर्षी वैभव सूर्यवंशी बनला कर्णधार! क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय

Goa My Home Scheme: गोमंतकीयांना दिवाळीची भेट! 'माझे घर', मुंडकार हक्कांसह जमीन प्रकरणे दोन महिन्यांत निकाली काढणार

Mohammed Shami Test Cricket Retirement: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; भावनिक पोस्ट करत म्हणाला, 'माझं एकच स्वप्न होतं...'

Goa Politics: निवडणुकीला 3 महिने बाकी, भाजपचा मोठा निर्णय; संकल्प आमोणकर घेणार मंत्रिपदाची शपथ

Horoscope: शनिवारचे राशिभविष्य! मेष, मिथुनसह 4 राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; नोकरीपासून व्यवसायापर्यंत होणार मोठा आर्थिक फायदा

SCROLL FOR NEXT