Team India PTI
क्रीडा

SA vs IND: टीम इंडियाने दोनच दिवसात मारलं केपटाऊनचं मैदान! द. आफ्रिकेला पराभूत करत मालिकेतही बरोबरी

South Africa vs India : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने केपटाऊनला झालेल्या दुसऱ्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत मालिकेतही बरोबरी साधली.

Pranali Kodre

South Africa vs India, 2nd Test at Cape Town:

भारतीय क्रिकेट संघाने गुरुवारी (४ जानेवारी) दक्षिण आफ्रिकेला कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 7 विकेट्सने पराभूत केले. भारताने या सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी विजय नोंदवत दोन सामन्यांच्या मालिकेतही १-१ अशी बरोबरी साधली.

दरम्यान, भारताचा केपटाऊनमधील हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिलाच विजय आहे. यापूर्वी भारताने केपटाऊनमध्ये खेळलेल्या ६ कसोटी सामन्यांपैकी ४ सामन्यांत पराभव पाहिला आहे, तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. पण अखेर भारताने केपटाऊनमध्ये गुरुवारी पहिल्या कसोटी विजयाची नोंद केली.

इतकेच नाही, तर भारतीय संघ केपटाऊनमध्ये कसोटी विजय मिळवणारा पहिला आशियाई संघ ठरला आहे. यापूर्वी आशियातील कोणत्याच संघाला असा कारनामा करता आला नव्हता.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर ७९ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान भारताने १२ षटकात ३ विकेट्स गमावत ८० धावा करून पूर्ण केले.

दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा डाव संपल्यानंतर ७९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून सलामीला यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा उतरले. या दोघांनी शानदार सुरुवात केली होती. जयस्वालने पहिल्याच षटकात आक्रमक फटके खेळले. त्यांनी सलामीला ४४ धावांची भागीदारी करत भारताच्या विजयाचा पाया रचला.

जयस्वाल चांगल्या सुरुवातीनंतर ६ व्या षटकात २३ चेंडूत ६ चौकारांसह २८ धावा करून बाद झाला. त्यानंतर काही वेळातच शुभमन गिलही १० धावांवर बाद झाला. यानंतर विराटने रोहितची साथ दिली.

मात्र विजयासाठी ४ धावांची गरज असतानाच विराट १२ धावांवर माघारी परतला. अखेर रोहित आणि श्रेयस अय्यरने विजयावर शिक्कामोर्तब केले. १२ व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर श्रेयसने चौकार ठोकत विजय निश्चित केला. रोहित १७ धावांवर नाबाद राहिला.

दक्षिण आफ्रिकेकडून या डावात कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर आणि मार्को यान्सिन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात 36.5 षटकात 176 धावांवर संपला होता. मात्र, पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकने 98 धावांची पिछाडी स्विकारलेली असल्याने त्यांना भारतासमोर विजयासाठी 79 धावांचे आव्हान ठेवता आले होते.

दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेकडून एडेन मार्करमने सर्वाधिक १०६ धावांची खेळी केली. त्याने १०३ चेंडूत १७ चौकार आणि २ षटकारांसह ही खेळी केली. त्याच्यानंतर डीन एल्गारने दक्षिण आफ्रिकेकडून १२ धावांची खेळी केली होती. तसेच डेव्हिड बेडिंगहॅम आणि मार्को यान्सिन यांनी प्रत्येकी ११ धावांची खेळी केली होती.

याव्यतिरिक्त कोणालाही दोन आकडी धावसंख्या गाठता आली नाही.भारताकडून या डावात जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या.

तत्पुर्वी, पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या डावात 23.2 षटकात 55 धावांवर सर्वबाद झाला होता. या डावात दक्षिण आफ्रिकेकडून केवळ डेव्हिड बेडिंगघम (12) आणि काईल वेरेयन (15) यांनाच दोन आकडी धावसंख्या गाठता आली होती. भारताकडून या डावात गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने ६ विकेट्स घेतल्या होत्या.

त्यानंतर भारतीय संघही पहिल्या डावात ३४.५ षटकात १५३ धावांवर सर्वबाद झाला. पण भारताला ९८ धावांची महत्त्पपूर्ण आघाडी मिळाली. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ४६ धावा केल्या, तर रोहित शर्माने ३९ धावांची आणि शुभमन गिलने ३६ धावांची खेळी केली. या डावात भारताचे ६ फलंदाज शुन्यावर बाद झाले.

दक्षिण आफ्रिकेकडून या डावात कागिसो रबाडा, लुंगी एन्गिडी आणि नांद्रे बर्गर या तिघांनीही प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

SCROLL FOR NEXT