Indian Women Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

INDW vs AUSW: कागारुंशी दोन हात करण्यास इंडियन वुमन्स टीम सज्ज; वाचा एका क्लिकवर संपूर्ण टाईमटेबल

भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात उद्यापासून टी20 मालिका सुरू होणार आहे.

Pranali Kodre

भारतीय महिला संघ विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ भारतात आला आहे. ही 5 सामन्यांची टी20 मालिका शुक्रवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ दोन हात करण्यास सज्ज आहेत.

या मालिकेत भारतीय संघ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे, तर स्मृती मानधना उपकर्णधार आहे. तसेच हरलीन देवोल आणि यस्तिका भाटियाने भारताच्या टी20 संघात पुनरागमन केले आहे.

त्याचबरोबर अंजली सारवाणी हिला पहिल्यांदाच भारताच्या संघात स्थान मिळाले आहे. डावखरी वेगवान गोलंदाज असलेली अंजली रेल्वेकडून देशांतर्गत क्रिकेट खेळते. त्यामुळे आता हरलीन, यास्तिका आणि अंजली कशी कामगिरी करतात हे पाहाणे औत्सुक्याचे असेल. मात्र, या मालिकेला पुजा वस्त्राकरला मुकावे लागले आहे. ती दुखापतग्रस्त आहे.

याचबरोबर हृषिकेश कानिटकर यांची नियमित फलंदाजी प्रशिक्षक म्हणून ही भारतीय महिला संघाबरोबर पहिलीच मालिका असणार आहे. त्यांनी यापूर्वी प्रभारी फलंदाजी मार्गदर्शक म्हणून भारतीय महिला संघाला श्रीलंकेत मार्गदर्शन केले आहे. त्यावेळी श्रीलंका दौऱ्यात भारतीय महिला संघाने टी20 मालिकेत 2-1 आणि वनडे मालिकेत 3-0 अशा विजय मिळवला होता.

आता भारतीय संघ कानिटकरांच्या मार्गदर्शनाखाली बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाचा मायदेशात कसा सामना करणार, हे पाहावे लागेल.

भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघांमधील टी20 मालिकेतील सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होतील. तसेच सर्व सामने मुंबईत होणार आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय महिला संघ -

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), जेमिमाह रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग ठाकूर, मेघना सिंग, अंजली सारवाणी, देविका वैद्य, एस मेघना, ऋचा घोष (यष्टीरक्षक), हरलीन देवोल

नेट गोलंदाज - मोनिका पटेल, अरुंधती रेड्डी, एसबी पोखरकर आणि सिमरन बहादूर

भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला, टी20 मालिका

9 डिसेंबर - पहिला टी20 सामना, डीवाय पाटील स्टेडियम, मुंबई (वेळ - संध्या. 7.00 वा.)

11 डिसेंबर - दुसरा टी20 सामना, डीवाय पाटील स्टेडियम, मुंबई (वेळ - संध्या. 7.00 वा.)

14 डिसेंबर - तिसरा टी20 सामना, सीसीआय, मुंबई (वेळ - संध्या. 7.00 वा.)

17 डिसेंबर - चौथा टी20 सामना, सीसीआय, मुंबई (वेळ - संध्या. 7.00 वा.)

20 डिसेंबर - पाचवा टी20 सामना, सीसीआय, मुंबई (वेळ - संध्या. 7.00 वा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार! ODI World Cup 2027 मध्ये एकाच ग्रुपमध्ये दोन्ही संघ; टीम इंडियाचं संपूर्ण Schedule एका क्लिकवर

Industries Load Shedding: उद्योगांना वीज भारमानाचा मोठा फटका; सायंकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत 50 ते 100 टक्के लोडशेडिंग

Horoscope: शुक्रवार ठरणार लकी! 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी, आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

SCROLL FOR NEXT