Team India X/BCCIWomen
क्रीडा

INDW vs AUSW: भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहास रचण्याची संधी! कधी अन् कुठे रंगणार दुसरा T20I, घ्या जाणून

India Women vs Australia Women: भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात टी२० मालिकेतील दुसरा सामना रविवारी होणा आहे.

Pranali Kodre

India Women vs Australia Women 2nd T20I Match at Mumbai:

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात सध्या ३ सामन्यांची टी२० मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (७ जानेवारी) होणार आहे. हा सामना निर्णायक असून डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियम, नवी मुंबई येथे होणार आहे.

या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना भारताने ९ विकेट्सने जिंकला होता. त्यामुळे भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

त्याचमुळे आता रविवारी होणारा दुसरा सामना जिंकून भारताला मालिका खिशात घालण्याची संधी आहे. तसेच ऑस्ट्रेलिया देखील दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याबरोबरच आपले आव्हान कायम राखण्याच्या प्रयत्नात असेल.

भारताकडे इतिहास रचण्याची संधी

या सामन्यात विजय मिळवून जर भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली, तर ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा भारतीय महिला संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिका जिंकेल. यापूर्वी मायदेशात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी२० सामने खेळले आहेत.

यामध्ये २०१८ साली झालेल्या तिरंगी मालिकेचाही समावेश आहे, ज्यात इंग्लंडही सहभागी होता. ती मालिकाही ऑस्ट्रेलियाने जिंकली होती.

तसेच २०१२ आणि २०२२ साली देखील ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध भारतात टी२० मालिका खेळले. या दोन्ही मालिकेतही ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात पहिली टी२० मालिका जिंकण्याची संधी असणार आहे.

सामन्याची वेळ आणि लाईव्ह स्ट्रिमिंग

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात होणारा दुसरा टी२० सामना रविवारी संध्याकाळी ७ वाजता सुरु होणार आहे. हा सामना जिओ सिनेमा ऍप किंवा वेबसाईटवर ऑनलाईन पाहाता येणार आहे. तसेच स्पोर्ट्स १८ चॅनेलवरही टीव्हीवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार आहे.

असे आहेत संघ -

  • भारत - स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग, तितस साधू, मन्नत कश्यप, सायका इशाक, कनिका आहुजा, यस्त भाटिया, मिन्नू मणी

  • ऑस्ट्रेलिया - एलिसा हिली (यष्टीरक्षक/कर्णधार), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, एलिस पेरी, ऍश्ले गार्डनर, फोबी लिचफिल्ड, ग्रेस हॅरिस, ऍनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहॅम, मेगन शट, डार्सी ब्राउन, हिदर ग्रॅहम, एलाना किंग, जेस जोनासेन, किम गर्थ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

SCROLL FOR NEXT