Jhulan Goswami Dainik Gomantak
क्रीडा

England दौऱ्यासाठी भारतीय महिला संघ जाहीर, झुलन गोस्वामीची धाकड एन्ट्री

Indian Women's Cricket Team: आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Indian Women's Cricket Team: आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी-20 आणि एकदिवसीय मालिकेचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आली आहे. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ तीन टी-20 आणि तितकेच एकदिवसीय सामने खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेल्या संघाबद्दल बोलायचे झाल्यास, वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीचे संघात पुनरागमन झाले आहे. याशिवाय महिला टी-20 चॅलेंजमध्ये आपल्या धडाकेबाज फलंदाजीने सर्वांना चकित करणाऱ्या किरण नवगिरेला प्रथमच टी-20 मध्ये स्थान देण्यात आले आहे.

दरम्यान, महिला चॅलेंजमध्ये ट्रेलब्लेझर्सविरुद्ध किरण नवगिरेने 34 चेंडूत पाच षटकारांसह 69 धावा केल्या होत्या. त्यानंतर तिचे नाव सर्वांच्या ओठावर होते. तिच्या निवडीनंतर आता टी-20 संघात शफाली आणि ऋचानंतर किरणच्या रुपाने आणखी एका पॉवर हिटरचा समावेश झाला आहे. चला तर मग दोन्ही संघांवर एक नजर टाकूया...

T20 संघ: हरमनप्रीत कौर (Captain), स्मृती मानधना (Vice Captain), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्राकर, जेमिमाह रॉड्रिग्ज, स्नेह रान, रेणुका ठाकूर, मेघना सिंग, राधा यादव, सबीनीन मेघना, तानिया भाटिया (WK), राजेश्वरी गायकवाड डी. हेमलता, सिमरन दिल बहादूर, रिचा घोष (Wk), केपी नवगिरे

वनडे: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (Smriti Mandhana), शफाली वर्मा, सबीनीन मेघना, दीप्ती शर्मा, तानिया भाटिया (डब्ल्यूके), यास्तिका भाटिया (विश्‍व के), पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रेणुका ठाकूर, मेघना सिंग, राजेश्वरी गायकवाड, सिमरन दिल बहादूर, झुलन गोस्वामी आणि जेमिमाह रॉड्रिग्ज

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ECB New Rules: दारूला पूर्ण बंदी, सोशल मीडियावरही नियंत्रण! क्रिकेटपटूंसाठी बोर्डाचे 6 कडक नियम लागू, शिस्तभंगावर करडी नजर

VIDEO: "मनीषाशीच लग्न लावा, नाहीतर जीव देईन"; तरुणी चढली मोबाईलच्या टॉवरवर, समलैंगिक प्रेमप्रकरणाचा हायव्होल्टेज ड्रामा

Crime News: आईवर डोळा, मुलगा ठरला अडथळा; आठ वेळा जमिनीवर आपटून दीड वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा

Rajpal Yadav Jail: राजपाल यादवच्या अडचणीत वाढ! चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा दणका, 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

SCROLL FOR NEXT