Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs SL: आशिया कपमध्ये टीम इंडियाची विजयी सुरुवात, श्रीलंकेचा उडवला धुव्वा

Womens Asia Cup T20 2022: भारतीय महिला संघाने आशिया कप 2022 टी-20 स्पर्धेत विजयाने सुरुवात केली आहे.

दैनिक गोमन्तक

India Women vs Sri Lanka Women: भारतीय महिला संघाने आशिया कप 2022 टी-20 स्पर्धेत विजयाने सुरुवात केली आहे. आशिया चषक 2022 मध्ये भारतीय महिला संघाचा पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध खेळला गेला, ज्यामध्ये संघाने 41 धावांनी विजय मिळवला. भारताविरुद्धच्या या सामन्यात श्रीलंकेची कर्णधार चामारी अटापट्टूने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु भारतीय महिला संघाची विस्फोटक फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जच्या खेळीने तिचा निर्णय चुकीचा ठरवला.

जेमिमा रॉड्रिग्जने शानदार खेळी केली

आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) च्या पहिल्या टी-ट्वेन्टी सामन्यात टीम इंडियाने (Team India) प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 विकेट गमावत 150 धावा केल्या. टीम इंडियाकडून जेमिमा रॉड्रिग्जने सर्वाधिक 76 धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही सर्वात मोठी खेळी होती. जेमिमाशिवाय शफाली वर्माने 10 धावांचे, स्मृती मंधानाने 6 धावांचे, हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) 33 धावांचे आणि रिचा घोषने नाबाद 13 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, श्रीलंकेकडून (Sri Lanka) ओशादी रणसिंघेने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर सुगंधिका कुमारी आणि चामारी अटापट्टूने 1-1 बळी घेतला.

राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले

बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये ऐतिहासिक रौप्यपदक जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाला या महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या T20 मालिकेत 1-2 असा पराभव पत्करावा लागला होता. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघाने एकदिवसीय सामन्यात शानदार पुनरागमन केले. शिवाय, अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीला (Jhulan Goswami) निरोप देण्यासाठी 3-0 असा क्लीन स्वीप केला.

सात संघ सहभागी होत आहेत

या स्पर्धेत भारत (India), पाकिस्तान, थायलंड, श्रीलंका, मलेशिया, संयुक्त अरब अमिराती आणि यजमान बांगलादेश असे एकूण सात संघ सहभागी होत आहेत. प्रत्येक संघ एकमेकांशी राउंड रॉबिन पद्धतीने खेळतील. अशा प्रकारे सहा सामने होतील. लीग टप्प्यातील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

SCROLL FOR NEXT