India vs Zimbabwe T20 Series Timetable @ICC
क्रीडा

Ind vs Zim T20 Series Timetable: झिम्बाब्वेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार भारत; वेळापत्रक जाहीर

India vs Zimbabwe T20 Series Schedule (in Marathi): झिम्बाब्वे क्रिकेटने 6 फेब्रुवारी रोजी भारतासोबत घरच्या मैदानावर टी-20 मालिका खेळण्याची घोषणा केली आहे.

Manish Jadhav

India vs Zimbabwe T20 Series Timetable:

झिम्बाब्वे क्रिकेटने 6 फेब्रुवारी रोजी भारतासोबत घरच्या मैदानावर टी-20 मालिका खेळण्याची घोषणा केली आहे. भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील ही टी-20 मालिका टी-20 विश्वचषक 2024 नंतर खेळवली जाईल.

मंगळवारी 6 फेब्रुवारी रोजी, भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) आणि झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने या मालिकेची घोषणा केली आहे. दोन्ही संघांमधील ही मालिका 6 जुलै 2024 पासून सुरु होणार आहे.

विशेष म्हणजे, भारतीय संघ ही मालिका झिम्बाब्वेमध्ये खेळणार आहे. झिम्बाब्वे (Zimbabwe) क्रिकेटने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, 'ही मालिका आयोजित करण्याचा उद्देश द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे आणि दोन्ही क्रिकेट मंडळांमधील सहकार्याच्या भावनेला चालना देणे हा आहे.'

बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले की, “बीसीसीआयने (BCCI) जागतिक क्रिकेट समुदायाला योगदान देण्यात नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे. आम्ही समजतो की, झिम्बाब्वे क्रिकेटला सध्या आमच्या सपोर्टची गरज आहे.''

भारत आणि झिम्बाब्वे T20 मालिकेचे पूर्ण वेळापत्रक

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील ही टी-20 मालिका जुलै 2024 मध्ये खेळवली जाणार आहे. मात्र, या मालिकेला अजून बराच वेळ शिल्लक असल्याने दोन्ही संघांकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. याआधी भारतीय संघ 2024 चा टी-20 विश्वचषक खेळणार आहे. जो जूनमध्ये सुरु होईल. या T20 मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे. या मालिकेतील सर्व सामने हरारे येथे होणार आहेत.

पहिला सामना- 6 जुलै (हरारे)

दुसरा सामना- 7 जुलै (हरारे)

तिसरा सामना- 10 जुलै (हरारे)

चौथा सामना- 13 जुलै (हरारे)

पाचवा सामना- 14 जुलै (हरारे)

झिम्बाब्वे चौथ्यांदा टी-20 मालिकेचे आयोजन करणार

झिम्बाब्वे चौथ्यांदा भारताविरुद्ध टी-20 मालिकेचे यजमानपद भूषवणार आहे. याआधी झिम्बाब्वेने 2010, 2015 आणि 2016 मध्ये भारतीय संघाविरुद्ध टी-20 मालिकेचे आयोजन केले होते. आता चौथ्यांदा झिम्बाब्वे टी-20 मालिकेचे यजमानपदासाठी सज्ज झाला आहे.

दोन्ही संघ शेवटच्या वेळी कधी आमनेसामने आले होते?

दोन्ही संघांमध्ये अनेक टी-20 सामने खेळले गेले असले तरी, भारत आणि झिम्बाब्वे 2022 च्या T20 विश्वचषकात आमनेसामने आले होते. भारतीय संघाने हा सामना 71 धावांनी जिंकला होता. या सामन्यात भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने अप्रतिम खेळी केली होती. या सामन्यात सूर्याच्या बॅटमधून अवघ्या 25 चेंडूत 61 धावा आल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UPI Payment New Rule: यूपीआय वापरणाऱ्यांसाठी सर्वात मोठी खूशखबर! 2000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर 1 रुपयाही चार्ज लागणार नाही; गॅझेट नोटिफिकेशन जारी

Horoscope 15 September 2026: ग्रहांचा मोठा फेरबदल! पैशांच्या बाबतीत 'या' राशी ठरणार लकी; आजच्या दिवशी नोकरीत नवीन संधीचा सुवर्णयोग

Terrorist Masood Azhar: पाकड्यांचं नवं नाटक! FATFच्या कचाट्यातून सुटण्यासाठी पाकिस्तानचा बनाव; अजहर मसूदवर 70 लाखांचा इनाम

Donald Trump: "चीन अमेरिकेची हेरगिरी करतो अन् आम्हीही...!" ट्रम्प यांचा शी जिनपिंग यांच्या दौऱ्यापूर्वी खळबळजनक दावा; जागतिक राजकारणातील स्पाय वॉर

Goa Sport: अवनी सावंतची राष्ट्रीय स्पर्धेत भन्नाट कामगिरी! अष्टपैलू खेळाने गोव्याला 14 वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेटचे विजेतेपद मिळवून दिले

SCROLL FOR NEXT