Rohit Sharma
Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

Ind Vs WI: रोहित शर्मा बनला ड्रायव्हर, टीम इंडियाचा स्टंट झाला व्हायरल- Video

दैनिक गोमन्तक

India vs West Indies: टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धची पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका 4-1 अशी जिंकली. या मालिकेतील शेवटचा सामना रविवारी अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळला गेला, जो भारताने 88 धावांनी एकतर्फी जिंकला. या सामन्यात रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती, तर त्याच्या जागी हार्दिक पांड्याने संघाची धुरा सांभाळली होती. सामन्यादरम्यान, रोहित शर्मा पूर्णपणे वेगळ्या शैलीत दिसला.

दरम्यान, रोहित गोल्फजवळ कार चालवताना दिसून आला. त्याच्यासोबत या कारमध्ये आर अश्विन, दिनेश कार्तिकही (Dinesh Karthik) होते. त्याचा व्हिडिओ विंडीज क्रिकेटने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर केला आहे. जेव्हा रोहित ड्रायव्हर झाला तेव्हा डीके आणि अश्विन व्यतिरिक्त ऋषभ पंत, संजू सॅमसन, कुलदीप यादव, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि रवी बिश्नोई देखील त्यांच्यासोबत दिसून आले.

दुसरीकडे, या मालिकेत टीम इंडियाच्या युवा क्रिकेटपटूंनी चमकदार कामगिरी केली. अर्शदीप सिंगला (Arshdeep Singh) मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. या मालिकेतील पहिल्या चार सामन्यांमध्ये संघ व्यवस्थापनाने संजू सॅमसनला डावाची सलामी दिली. सूर्याने सलामीवीराची भूमिका अतिशय चोख बजावली.

तसेच, भारतीय संघाला या महिन्याच्या अखेरीस आशिया कप 2022 मध्ये खेळायचे आहे. ज्यासाठी आज संघाची घोषणा होऊ शकते. अशा स्थितीत या मालिकेतील कामगिरीच्या जोरावर अर्शदीप सिंगची निवड निश्चित झाल्याचे दिसते. टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप (T-20 World Cup) 2021 मध्ये सेमीफायनलमध्ये पोहोचू शकली नाही, परंतु त्यानंतर टीम इंडियाने (Team India) या फॉरमॅटमध्ये जबरदस्त पुनरागमन केले आहे. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात (Australia) टी-20 विश्वचषक होणार आहे. टीम इंडिया ज्या पद्धतीने कामगिरी करत आहे, त्यामुळे ते विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये गणले जात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT