भारत विरुध्द श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना (ODI) आज होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल. पहिल्या सामन्यात भारताच्या यंग ब्रिगेडने धडाकेबाज खेळ केला. त्याचीच पुनरावृत्ती आजच्या सामन्यात करुन मालिका (India vs Sri Lanka series) खिशात घालण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न राहिल.
(India vs Sri Lanka: India will eye for series win)
पहिल्या सामन्यात भारतीय फिरकीच्या जाळ्यात श्रीलंकेचे फलंदाज अडकले, आणि भारतीय फलंदाजांनी धुवांधार फलंदाजी करत सामना 7 विकेटस ने जिंकला. आता शिखर धवनची सेना दुसऱ्या सामन्यासाठी तयार आहे. पहिल्या सामन्यात पृथ्वी शॉ आणि एकदिवसीय सामन्यात भारताकडून पदार्पण करणारे इशांत किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी तडाखेबाज फलंदाजी करत भारताचा विजय सोपा केला.
या शानदार प्रदर्शनानंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदलाव होण्याची शक्यता कमी आहे. गोलंदाजीत कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या जोडीने आम्ही दोघे एकसाथ चांगली कामगिरी करु शकतो, हे दाखवून दिले आहे.
दुसरीकडे श्रीलंकेला चमिका करुणारत्ने याच्याकडून श्रीलंकेच्या संघाला खूप अपेक्षा आहेत. याबाबत बोलताना तो म्हणाले, आम्ही काहीतरी मोठे करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आमचे फलंदाज जर जास्तवेळी मैदानात थांबले तर आम्ही मोठी धावसंख्या उभी करु शकतो. आमच्या फलंदाजांमध्ये 300 ते 350 धावा बनविण्याची क्षमता आहे. येणाऱ्या सामन्यात आम्ही चांगला खेळ करण्याचा नक्की प्रयत्न करु असे त्याने नमूद केले.
दोन्ही देशांचे संपूर्ण पथक
भारत: शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उप-कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिककल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, ईशान किशन (WK), संजू सॅमसन (WK), युजवेंद्र चहल, राहुल चहर, के गौतम , कुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकरिया
श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), धनंजय डी सिल्वा (उप-कर्णधार), अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, पथुम निसंका, चरित अस्लंका, वनिंदू हसरंगा, अशेन बंडारा, मिनोद भानुका, लाहिरू उदारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चनेरा, , लक्षन संदाकन, अकिला धनंजय, शिरन फर्नांडो, धनंजय लक्षण, ईशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रेमा, असिथा फर्नांडो, कसुन रजिता, लाहिरू कुमारा, इसुरु उदाना.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.