Suryakumar Yadav and Shubman Gill
Suryakumar Yadav and Shubman Gill Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL, 1st ODI: ईशान किशनसह सूर्यकुमारलाही वगळलं, 'अशी' आहे टीम इंडियाची Playing XI

Pranali Kodre

India vs Sri Lanka: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात मंगळवारपासून 3 सामन्यांची वनडे मालिका सुरू झाली असून पहिला सामना गुवाहाटी येथे होत आहे. या सामन्यात पाहुण्या श्रीलंकेने नाणेफेक जिंकली असून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, भारताच्या संघात विश्रांतीनंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, मोहम्मद सिराज, मोहम्मद सिराज यांचे पुनरागमन झाले आहे. मात्र, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवता आलेले नाही.

मागील 8-9 महिन्यांतील वनडे क्रिकेटमधील कामगिरीचा विचार करून प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळाडूंना संधी दिली जाईल, असे यापूर्वीच रोहितने स्पष्ट केले होते. त्याचमुळे शुभमन गिलला ईशानऐवजी आणि श्रेयस अय्यरला सूर्यकुमारऐवजी पहिली पसंती दिली गेली आहे.

तसेच श्रीलंकेने प्लेइंग इलेव्हनमध्ये दिलशान मदुशंका याला संधी दिली आहे. त्यामुळे या सामन्यातून तो वनडे पदार्पण करेल.

दरम्यान, या मालिकेपासून यावर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने दोन्ही संघांच्या तयारीला सुरुवात होईल.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन -

भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, उमरान मलिक, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.

श्रीलंका संघ - पाथम निसंका, कुशल मेंडिस (यष्टीरक्षक), अविष्का फर्नांडो, धनंजय डी सिल्वा, चरिथ असलंका, दसून शनका (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुनिथ वालालगे, कसून रजिता, दिलशान मदुशंका

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Vehicle : ई-वाहन खरेदीकडे ग्राहकांची पाठ; दरमहा ८२४ वाहनांची नोंद

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित

SSC Result Sanguem : सांगे तालुक्यात सरकारी शाळांची बाजी; दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव

Nepal: नेपाळनेही एव्हरेस्ट, MDH मसाल्यावर घातली बंदी; धोकादायक केमिकलबाबत केली कारवाई

SCROLL FOR NEXT