India vs South Africa Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SA: T20 मालिकेची उत्कंठा शिगेला पण सामन्यावर पावसाचे संकट

India vs South Africa: भारतीय संघ आज बंगळुरूच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाचवा T20 सामना खेळणार आहे. या सामन्यातील मजा पावसामुळे खराब होऊ शकते.

दैनिक गोमन्तक

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली होती. पण त्यानंतर टीम इंडियाने सलग दोन सामने जिंकून मालिकेत पुनरागमन केले आहे. आता भारतीय संघाला मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे, पण आज होणाऱ्या सामन्यात पावसाचे संकट दिसत आहे. (india vs south africa 5th t20 match rain may spoil game news)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या सामन्यात पावसामुळे व्यत्यय येऊ शकतो. हवामान खात्यानुसार, बंगळुरूमध्ये आज पावसाची शक्यता आहे. असं असलं तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे रणजी ट्रॉफीच्या सामन्यांवरही परिणाम झाला आहे. जर पाऊस थांबला नाही तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाऊ शकते, कारण यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.

दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 19 टी-20 सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी टीम इंडियाने (Team India) 11 जिंकले आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेला 8 सामने जिंकण्यात यश आले आहे. भारतीय संघ आजपर्यंत आफ्रिकन (South Africa) संघाविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर मालिका जिंकू शकलेला नाही. टीम इंडियाला मालिका जिंकण्याची चांगली संधी आहे.

सर्वांच्या नजरा कार्तिकवर असतील

शेवटच्या टी-20 सामन्यात दिनेश कार्तिकने चांगली फलंदाजी केली. त्याने 27 चेंडूत 55 धावा केल्या. त्याच्यामुळेच टीम इंडियाला सामना जिंकता आला. त्याचबरोबर भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल हे दोघे कशी गोलंदाजी करतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल. यावरही सामन्याचा निकाल अवलंबून असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

History: कर्नाटक, महाराष्ट्र ते आंध्र: सहा शतके दख्खनवर अधिराज्य गाजवणाऱ्या 'चालुक्य' घराण्याची शौर्यगाथा

SCROLL FOR NEXT