Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SA: तिसऱ्या वनडेपूर्वी टीम इंडियाला दे धक्का! मालिका विजयाचे भंगू शकते स्वप्न

Team India: तिसऱ्या आणि निर्णायक वनडेआधीच टीम इंडिया आणि भारतीय चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे.

दैनिक गोमन्तक

India vs South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना उद्यापासून नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दुपारी 1.30 वाजता खेळवला जाणार आहे. तिसऱ्या आणि निर्णायक वनडेआधीच टीम इंडिया आणि भारतीय चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची (South Africa) वनडे मालिका जिंकण्याचे टीम इंडियाचे स्वप्न भंगू शकते. ही तीन सामन्यांची वनडे मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. वनडे मालिका जिंकण्यासाठी भारताला तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करावा लागेल. पावसामुळे या सामन्याचा निकाल लागला नाही तर मालिका 1-1 अशी बरोबरीत राहील. त्यामुळे टीम इंडियाचे (Team India) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका जिंकण्याचे स्वप्नही भंगणार आहे.

तिसऱ्या वनडेपूर्वी टीम इंडियासाठी ही वाईट बातमी आली

तिसरा आणि निर्णायक वनडे सामना उद्यापासून नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दुपारी 1.30 वाजता खेळवला जाणार आहे. वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्लीत पाऊस पडत आहे. सामन्याच्या दिवशी म्हणजे उद्याही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तिसरा आणि निर्णायक वनडे सामन्यात पावसामुळे अडथळा निर्माण झाला तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका जिंकण्याची भारताची संधी संपुष्टात येईल. अशा स्थितीत भारताला (India) मालिकेत 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अग्रलेख: गोव्यात गुन्हा करा, 'बिनधास्त पसार' व्हा! सुरक्षा यंत्रणांना जाग येण्यापूर्वीच गुन्हेगार गायब

Goa Politics: 'शांत राहा! आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात', मनोज परब यांचा दावा, कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याचे आवाहन; Watch Video

DLF Housing Project: 'दाबोळी टेकडीवरील एकाही झाडाला हात लावू नका', कोर्टाची 'डीएलएफ'ला ताकीद

Goa Politics: खरी कुजबुज; काँग्रेस 'झेडपी' निवडणुकीबाबत गंभीर आहे?

Rohit Sharma: 'बूम बूम' आफ्रिदीचा विक्रम विक्रम उद्ध्वस्त होणार? 'हिटमॅन' रोहित शर्मा बनणार 'सिक्सर किंग', फक्त 'इतक्या' षटकारांची गरज

SCROLL FOR NEXT