Ind vs Sa 2nd T20 Twitter/BCCI
क्रीडा

Ind vs Sa: भारताचा सलग दुसरा पराभव, दक्षिण आफ्रिकेने 4 विकेटने जिंकला सामना

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने कटकमध्ये विजयी मार्गावर परतण्याचादुसरा प्रयत्न केला पण तो असफल ठरला.

दैनिक गोमन्तक

IND vs SA 2nd T20: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज रविवारी पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा दुसरा टी-20 सामनाही गमावला आहे. कटक येथील बाराबती स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने होते. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिला सामना 7 गडी राखून जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दुसऱ्या सामन्यात भारताचा 4 गडी राखून जिंकला. पहिल्या T20 मध्ये भारताला 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचबरोबर आता ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने कटकमध्ये विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 149 धावांचे लक्ष्य ठेवले होते. (India vs South Africa 2nd T20)

भारतीय गोलंदाजांची हेनरिक क्लासेनने जोरदार क्लास लावली. त्याने 46 चेंडूंत 7 चौकार आणि 5 षटकारांसह 81 धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमारने 4, युजवेंद्र चहल आणि हर्षल पटेलने प्रत्येकी एक विकेट घेतली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने पाच सामन्यांच्या दुसऱ्या T20 मालिकेत 2-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे.

नाणेफेक हारल्यानंतर भारतीय संघाने फलंदाजीचा निर्णय घेत निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 148 धावा केल्या. भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर ऋतुराज गायकवाड पहिल्याच षटकातच बाद झाला. यानंतर इशान किशन (21 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 34 धावा) आणि श्रेयस अय्यरने (35 चेंडूत 40 धावा) दुसऱ्या विकेटसाठी 45 धावा जोडून डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. इशानच्या सातव्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतल्याने भारताचा डाव फसला.

मात्र, अय्यर 14 व्या षटकापर्यंत कायम राहिला. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 2 षटकार मारले. ऋषभ पंत (5), हार्दिक पंड्या (9) आणि अक्षर पटेल (10) फार काही करू शकले नाहीत. अशा स्थितीत दिनेश कार्तिक (21 चेंडूत नाबाद 30) आणि हर्षल पटेल (9 चेंडूत नाबाद 12) यांनी सहाव्या विकेटसाठी 36 धावांची अखंड भागीदारी करून बऱ्यापैकी धावसंख्या गाठली. दक्षिण आफ्रिकेतर्फे अॅन्रिक नोर्कियाने दोन तर कागिसो रबाडा, ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT