India vs Pakistan Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: शिक्कामोर्तब झालं! भारत-पाकिस्तानसह 9 सामन्यांच्या वेळापत्रकात बदल, ICC ची घोषणा

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान सामन्याबरोबरच एकूण ९ सामन्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. याच भारताच्या दोन सामन्यांचाही समावेश आहे.

Pranali Kodre

ICC Cricket World Cup 2023, India vs Pakistan, Date Change: भारतात 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकप 2023 स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या 13 व्या वनडे वर्ल्डकपचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. मात्र, आता या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत.

बदललेल्या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान संघात  भारत आणि पाकिस्तान सामना 15 ऑक्टोबरऐवजी 14 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. दरम्यान तारखेत बदल झाला असला तरी ठिकाणात बदल झालेला नाही. त्यामुळे सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच खेळवला जाणार आहे.

त्याचमुळे इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात दिल्लीला होणारा 14 ऑक्टोबर रोजी होणारा सामना आता 15 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. तसेच पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना 12 ऑक्टोबर ऐवजी 10 ऑक्टोबर रोजी हैदराबादला खेळला जाईल. तसेच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना 13 ऑक्टोबर ऐवजी 12 ऑक्टोबर रोजी लखनऊला खेळला जाईल.

त्याबरोबर न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यातील 14 ऑक्टोबर रोजी चेन्नईत होणारा सामना 13 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल.

याशिवाय नोव्हेंबर महिन्यात 12 तारखेला होणारे ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश संघातील पुण्याला आणि इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघातील कोलकाताला होणारा सामना 11 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल, तर भारत विरुद्ध नेदरलँड्स यांच्यातील सामना 11 ऐवजी 12 नोव्हेंबर रोजी बंगळुरूला खेळवला जाईल.

याशिवाय 10 ऑक्टोबर रोजी धरमशाला येथे खेळल्या जाणाऱ्या इंग्लंड विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामन्याच्या वेळेत बदल झाला आहे. हा सामना दिवस-रात्र खेळवला जाणार होता. पण आता हा सामना सकाळी 10.30 वाजता सुरू होईल.

मिळालेल्या माहितीनुसार 15 ऑक्टोबर रोजी नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे. त्याचमुळे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे वेळापत्रक बदलण्यात आले. त्यामुळे अन्य काही सामन्यांचे वेळापत्रकही बदलण्यात आले.

तसेच 12 नोव्हेंबरला पश्चिम बंगालमध्ये काली पूजा आहे. बंगालमध्ये हा मोठा आणि प्रमुख सणांपैकी एक आहे. तसेच याचदिवशी दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजेच लक्ष्मीपूजन आहे. त्यामुळे इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात कोलकाताला होणाऱ्या सामन्याचे वेळापत्रक बदलण्यात आले.

अहमदाबाद आणि कोलकाता पोलिसांनी राज्य संघटनेकडे सणांच्या दिवशी सुरक्षेबद्दल काळजी व्यक्त केली होती, त्यानंतर हे बदल करण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT