Team India Dainik Gomantak
क्रीडा

India vs Pakistan: पुन्हा एकदा रंगणार भारत-पाक महामुकाबला! हिसाब चुकता करण्यास टीम इंडिया सज्ज; हाय-व्होल्टेज लढतीकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष

India vs Pakistan Cricket Match: दोहा येथे रंगणाऱ्या 50 षटकांच्या 'एसीसी मेन्स रायझिंग स्टार्स आशिया चषक 2026' स्पर्धेत भारत-अ संघ पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

Manish Jadhav

India vs Pakistan Cricket Match: क्रिकेटप्रेमींसाठी पुन्हा एकदा हाय-व्होल्टेज थरार अनुभवण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या अंडर-19 आशिया चषकाच्या फायनल सामन्यात भारताने पाकिस्तानचा 1 विकेटने पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या थरारक विजयाचा उत्साह कायम असतानाच, आता येत्या 22 नोव्हेंबरला भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहे. दोहा येथे रंगणाऱ्या 50 षटकांच्या 'एसीसी मेन्स रायझिंग स्टार्स आशिया चषक 2026' स्पर्धेत भारत-अ संघ पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे.

गतवर्षी दोहा येथे झालेल्या मेन्स रायझिंग स्टार्स स्पर्धेत पाकिस्तानने भारताचा 8 विकेट्सनी पराभव करत जेतेपद पटकावले होते. त्या पराभवाचा वचपा काढण्याची नामी संधी यंदा भारतीय संघाकडे आहे. दोहा येथील 'वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम'वर भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. या स्पर्धेसाठी भारतीय संघ (Team India) अत्यंत संतुलित आणि मजबूत निवडण्यात आला असून, युवा फलंदाज तिलक वर्मा याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. तसेच, रजत पाटीदार स्पर्धेतून बाहेर पडल्याने धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंह याची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली.

अभिषेक आणि वैभवच्या सलामीकडे लक्ष

या महामुकाबल्यात भारतीय डावाची सुरुवात अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी करणार आहेत. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटचा अनुभव गाठीशी असलेले हे दोन्ही डावखुरे फलंदाज आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात. सलामीला येऊन पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई करण्याची क्षमता या जोडीत आहे. त्यांच्यासोबतच मध्यफळीत कर्णधार तिलक वर्मा, रिंकू सिंह आणि प्रभसिमरन सिंह यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

दोन्ही संघ

भारत-अ संघ: तिलक वर्मा (कर्णधार), रिंकू सिंह (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, सूर्यांश शेडगे, आयुष बडोनी, शाहबाज अहमद, विप्रज निगम, हर्ष दुबे, तनुष कोटियान, अरशद खान, प्रभसिमरन सिंह, कुमार कुशाग्र, हर्षित राणा आणि प्रिन्स यादव.

पाकिस्तान-अ संघ: अब्दुल समद (कर्णधार), फरहान यूसुफ, हैदर अली, हसन नवाज, शाहजेब खान, शामील हुसैन, माज सदाकत, साद मसूद, दानिश अजीज, मोहम्मद इमरान, रोहिल नजीर, अहेड डॅनियल, मोहम्मद हसनैन, सुफयान मोकिम आणि अली रजा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: मांद्रेत आरोलकरांना मुख्यमंत्र्यांकडून बळ, विकासकामांचं केलं तोंडभरुन कौतुक; 2027 मध्ये जीत पुन्हा विक्रमी मतांनी निवडून येतील

VIDEO: पाकड्यांनी पुन्हा कॉपी केला भारतीय शो! समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट'नंतर आता 'पाकिस्तान गॉट लेटेंट'ची चर्चा; राखी सावंतच्या एन्ट्रीनं वेधलं लक्ष

Goa Water Crisis: 'जल है तो कल है'! यंदाच्या अपुऱ्या पावसामुळे गोव्यात पाणीटंचाईचे गडद संकट

Uttar Pradesh Assembly Election 2027: उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप, राममंदिर, राष्ट्रवाद आणि हिंदुत्वाचे मुद्दे झाले जुने; योगी आदित्यनाथ यांची अग्निपरिक्षा

Goa ST Political Reservation : राजकीय आरक्षणाच्या हक्कासाठी आदिवासी समाज रणांगणात उतरणार; आगामी विधानसभा निवडणुकीत 23 मतदारसंघांत सत्ताधाऱ्यांविरोधात लढण्याचा ‘उटा’चा निर्णय

SCROLL FOR NEXT