Suryakumar Yadav, VVS Laxman Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ, 3rd ODI: शेवटच्या वनडेतही येणार पावसाचा व्यत्यय? वाचा काय आहे हवामानाचा अंदाज

Pranali Kodre

IND vs NZ, 3rd ODI: न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाला बुधवारी यजमानांविरुद्ध वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना खेळायचा आहे. हा या दौऱ्यातील अखेरचा सामना आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.

पण, ख्राईस्टचर्च येथे होणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने चाहत्यांची निराशा होऊ शकते. हवामान अंदाजानुसार बुधवारी ख्राईस्टचर्च येथे जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हा सामनाही रद्द होण्याची शक्यताही वाढते.

यापूर्वी चालू वनडे मालिकेतील (ODI) दुसरा सामनाही पावसामुळे 12.5 षटकांच्या खेळानंतर रद्द करण्यात आला होता. त्यामुळे सध्या मालिकेतील पहिला सामना जिंकून न्यूझीलंड 1-0 अशा फरकाने आघाडीवर आहे.

त्याचमुळे तिसरा सामना जिंकून भारताला (Team India) मालिकेत बरोबरीची करण्याची आशा आहे. पण, जर तिसरा सामनाही पावसामुळे रद्द झाला, तर न्यूझीलंड ही मालिका आपल्या नावे करतील.

पावसाच्या सावटातील दौरा

वनडे मालिकेपूर्वी न्यूझीलंड आणि भारत यांच्यात झालेली टी20 मालिकेतही पावसाचा अडथळा आला होता. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली विजय मिळवला होता.

त्यानंतर तिसऱ्या सामन्यातही पावसाचा व्यत्यय आला होता. पण, तिसऱ्या सामन्याचा निकाल डकवर्थ लूईस नियमानुसार लावण्यात आलेला. त्यानुसार हा सामना बरोबरीत सुटला होता. त्यामुळे भारत 1-0 अशा फरकाने ही मालिका जिंकला होता.

भारतीय संघाला हा न्यूझीलंड दौरा संपला की बांगलादेश दौऱ्यावर जायचे आहे. बांगलादेश दौऱ्यात 3 सामन्यांची वनडे आणि 2 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. बांगलादेश दौऱ्याला 4 डिसेंबरपासून सुरुवात होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: गोवा काँग्रेसच्या प्रभारी सचिवांचा बैठकांचा धडाका; 'त्या' आमदारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन

Sunburn Festival 2024: त्यांनी कॅप्टनसारखे वागावे, बिनबुडाची विधाने करू नये; ‘सनबर्न’ याचिकेवरुन खंवटेंचे प्रत्त्युत्तर

Goa Live Updates: कुळण-सर्वण येथे विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू

Bhoma Highway: 'भोम प्रकल्प' गोव्याच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा! भाजपने मानले गडकरींचे आभार

Goa Traffic Department: सावधान! गोव्यात येताय? आता हेल्मेट नसल्यावर होणार 'ही' कारवाई

SCROLL FOR NEXT