Suryakumar Yadav  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ: फक्त सूर्याच नाही, तर रोहितसह 'या' भारतीय फलंदाजांनीही टी20 मध्ये खेळल्या 'मेडन ओव्हर'

सूर्यकुमार यादवने शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीत पहिल्यांदाच मेडन ओव्हर खेळली.

Pranali Kodre

India vs New Zealand: न्यूझीलंड क्रिकेट संघाने शुक्रवारी भारतीय क्रिकेट संघाला तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात 21 धावांनी पराभूत केले. त्यामुळे त्यांनी 1-0 अशी मालिकेत आघाडीही घेतली. न्यूझीलंडच्या या विजयात कर्णधार मिशेल सँटेनरचा मोठा वाटा राहिला. त्याने शानदार गोलंदाजी करताना सूर्यकुमार यादव विरुद्ध चक्क निर्धाव षटक टाकले.

सूर्यकुमार हा त्याच्या चौफेर फटकेबाजीसाठी ओळखला जातो. त्यामुळे त्याला भारताचा 'मिस्टर 360' असेही म्हटले जाते. त्यातच तो सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. असे असताना त्याच्याविरुद्ध संपूर्ण षटकच निर्धाव टाकण्याचा पराक्रम सँटेनरने करून दाखवला.

(Mitchell Santner bowled a maiden over to Suryakumar Yadav)

विशेष म्हणजे सँटेनरने हा पराक्रम पॉवरप्लेच्या अखेरच्या षटकात म्हणजेच भारतीय डावाच्या सहाव्या षटकात केला. यामुळे सूर्यकुमार आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये निर्धाव षटक खेळणारा पाचवा खेळाडू ठरला आहे.

यापूर्वी केएल राहुलने 5 वेळा आंतरराष्ट्रीय टी20मध्ये निर्धाव षटके खेळली आहेत विशेष म्हणजे त्याने पाचही वेळेस डावातील पहिले षटक निर्धाव खेळले आहे. त्याच्यानंतर शिखर धवनने 2 वेळा आंतरराष्ट्रीय टी20मध्ये निर्धाव षटके खेळली आहेत. त्याचबरोबर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी प्रत्येकी एक वेळा आंतरराष्ट्रीय टी20मध्ये निर्धाव षटक खेळले आहे.

दरम्यान, सूर्यकुमारने हे एक षटक सोडले तर शुक्रवारी चांगली फलंदाजी केली होती. त्याने 34 चेंडूत 47 धावांची खेळी केली होती. तसेच त्याने कर्णधार हार्दिक पंड्याबरोबर (21) 68 धावांची भागीदारीही केली होती. मात्र भारताकडून 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याला विजय मिळवून देता आला नाही.

त्याच्याव्यतिरिक्त वॉशिंग्टन सुंदरनेही 50 धावांची आक्रमक खेळी करत झुंज दिली होती. मात्र, भारताचे अन्य फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरल्याने भारताला 20 षटकात 9 बाद 155 धावाच करता आल्या.

न्यूझीलंडकडून सँटेनरने सर्वोत्तम गोलंदाजी करताना 4 षटकांत केवळ 11 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तसेच मायकल ब्रेसवेल आणि लॉकी फर्ग्युसन यांनीही प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी, न्यूझीलंडने डेवॉन कॉनवे (52) आणि डॅरिल मिशेल (59) यांच्या खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 176 धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT