India vs England ODI Team India suffers defeat Dainik Gomantak
क्रीडा

ENG vs IND: टीम इंडियाचे 'हे' 5 खेळाडू ठरले लाजिरवाण्या पराभवाचे कारण, कर्णधार अय्यरची एकाकी झुंज अपयशी; गोलंदाजांनी टेकले गुडघे

Reasons Behind Team India T20 Loss: टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात अत्यंत लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला.

Manish Jadhav

Team India Defeat Against England T20 2026: टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात अत्यंत लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात टीम इंडियाकडून कर्णधार श्रेयस अय्यरचा अपवाद वगळता इतर एकही खेळाडू मैदानावर टिकू शकला नाही किंवा प्रभावी कामगिरी करु शकला नाही. नाणेफेक हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 20 षटकांत 158 धावांचे आव्हान दिले होते.

भारताने (India) दिलेले हे माफक आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांनी केवळ 13.5 षटकांतच पूर्ण करत टीम इंडियाला पराभवाची धूळ चारली. भारताच्या या मानहानिकारक पराभवानंतर सोशल मीडिया आणि क्रिकेट जगतातून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, या पराभवाचे हे 5 खेळाडू मुख्य 'व्हिलन' ठरले.

या पराभवाचा पहिला मोठा व्हिलन म्हणजे वॉशिंग्टन सुंदर. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत सुंदर आपला पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. संघाला त्याच्याकडून फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर मोठ्या अपेक्षा होत्या; परंतु त्याने घोर निराशा केली. फलंदाजीत तो अवघ्या 5 धावा करुन बाद झाला, तर गोलंदाजी करताना त्याने टाकलेल्या एकमेव षटकात तब्बल 19 धावा दिल्या. तसेच, भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशन हा दुसरा व्हिलन ठरला.

आयपीएल संपल्यापासून ईशानचा फॉर्म पार घसरला असून त्याची बॅट पूर्णपणे शांत आहे. या संपूर्ण इंग्लंड दौऱ्यात त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. या महत्त्वपूर्ण सामन्यात तो 6 चेंडूत अवघ्या 4 धावा करुन तंबूत परतला. यापूर्वी आयर्लंड दौऱ्यावरही त्याला दोन सामन्यांत फक्त 13 धावा करता आल्या.

संघाचा माजी उपकर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल हा तिसरा व्हिलन ठरला. या मालिकेत त्याची कामगिरी अतिशय सुमार दर्जाची झाली. चौथ्या टी-20 सामन्यात फलंदाजी करताना त्याने 2 चेंडूत 1 धाव केली, तर गोलंदाजीत 2 षटकांत 24 धावा देऊन तो एकही बळी घेऊ शकला नाही. भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणारा प्रसिद्ध कृष्णा हा चौथा व्हिलन ठरला. त्याच्या गोलंदाजीत ना कोणती लय दिसत होती ना अचूक टप्पा. त्याने 3 षटकांत 26 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट घेता आली नाही.

पाचवा आणि अखेरचा व्हिलन ठरला अष्टपैलू शिवम दुबे. अलिकडच्या काळात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या दुबेकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, या सामन्यात त्याने गोलंदाजीत एका षटकात 15 धावा दिल्या, तर फलंदाजीत 23 चेंडू खर्ची घालत संथ गतीने केवळ 22 धावा केल्या. या पाचही प्रमुख खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे भारताला हा सामना गमवावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT