Team India Dainik Gomantak
क्रीडा

Ind vs ENG: पहिल्या टेस्टसाठी रोहित ब्रिगेड सज्ज; अशी असू शकते टीम इंडियाची Playing XI

India vs England Playing XI: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला उद्यापासून म्हणजेच 25 जानेवारीपासून सुरुवात होत आहे.

Manish Jadhav

India vs England Playing XI: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला उद्यापासून म्हणजेच 25 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. पहिल्या सामन्यात दोन्ही संघामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

तत्पूर्वी, विराट कोहली कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने खेळू शकणार नाही. बीसीसीआयने जेव्हा संघाची घोषणा केली तेव्हा त्यात कोहलीचे नाव होते, मात्र अचानक बीसीसीआयने सांगितले की, वैयक्तिक कारणामुळे कोहलीने माघार घेतली आहे. दरम्यान, आता प्रश्न असा आहे की कोहली बाहेर पडल्यानंतर पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते.

कोहली इंग्लंडविरुद्ध पुढील 3 कसोटी खेळू शकतो

आतापर्यंत बीसीसीआयने पहिल्या दोन कसोटींसाठीच टीम इंडिया जाहीर केली आहे. अशा स्थितीत कोहली उर्वरित 3 कसोटींमध्ये पुनरागमन करु शकतो, असे मानले जात आहे. दरम्यान, चौथ्या नंबरवर कोण खेळणार हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली यशस्वी जयस्वाल त्याच्यासोबत ओपनिंगला येईल, हे जवळपास निश्चित झाले आहे. सध्या शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता चौथ्या नंबरबद्दल बोलायचे झाल्यास, श्रेयस अय्यर किंवा केएल राहुलला इथे संधी दिली जाऊ शकते. मात्र, राहुल फलंदाज म्हणून खेळेल की कीपिंगची जबाबदारीही उचलेल हे सांगणे कठीण आहे.

केएल राहुल आणि केएस भरतला संधी मिळू शकते

दुसरीकडे, जर केएल राहुल फक्त फलंदाज म्हणून खेळला तर केएस भरतला आणखी एक संधी मिळू शकते. अलीकडेच त्याने इंग्लंड लायन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात एक अर्धशतक झळकावले. त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. असो, त्याला टीम इंडियात संधी मिळण्याबाबत कोणतीही शंका नाही, पण त्याने फलंदाजीतही योगदान दिले तर गोष्टी सोप्या होऊ शकतात. रवींद्र जडेजा आणि अश्विनची जागा जवळपास निश्चित झाली आहे. तिसरा फिरकीपटू म्हणून अक्षर पटेललाही संधी दिली जाऊ शकते. यानंतर वेगवान गोलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या रुपाने जगातील सर्वोत्तम गोलंदाज जबाबदारी सांभाळू शकतात.

दरम्यान, अशी प्लेइंग इलेव्हन असेल तर दोन वेगवान गोलंदाज आणि तीन फिरकीपटू असतील. यातील चांगली गोष्ट म्हणजे तिन्ही फिरकीपटू फलंदाजीही करु शकतात. जसप्रीत बुमराहला देखील कठिण परिस्थितीत कशी फलंदाजी कशी करावी हे माहित आहे आणि त्याने हे अनेकदा सिद्धही केले आहे. म्हणजेच दहाव्या नंबरपर्यंत भारताची फलंदाजीही असेल. मात्र, कर्णधार रोहित शर्मा दोन वेगवान गोलंदाज मैदानात उतरवणार की तीन, याचे उत्तर खेळपट्टी पाहूनच मिळणार आहे. असो, हैदराबादमध्ये प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी सामना होत आहे, त्यामुळे यावेळी खेळपट्टी कशी असेल हे सांगणे कठीण आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, केएस भरत, अक्षर पटेल, रवी अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या 'श्रुती'ला दिलासा; फोंडा कोर्टाकडून जामीन!

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT