Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs BAN, 1st ODI: कुलदीप सेनचे पदार्पण, तर केएल राहुल यष्टीरक्षक; पाहा 'प्लेइंग इलेव्हन'

बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात रविवारी होणाऱ्या पहिल्या वनडेतून कुलदीप सेनने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे.

Pranali Kodre

IND vs BAN, 1st ODI: भारतीय क्रिकेट संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून रविवारी या दोन संघात वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेश संघाचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, भारताकडून कुलदीप सेन (Kuldeep Sen) याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण झाले आहे. तसेच या मालिकेतून टी20 वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल अशा खेळाडूंचे संघात पुनरागमन झाले आहे. या खेळाडूंना टी20 वर्ल्डकपनंतर झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती देण्यात आलेली.

नाणेफेक झाल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) असेही स्पष्ट केले आहे की काही दुखापतींमुळे संघात मोठे बदल करावे लागले आहेत. तसेच केएल राहुल यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहे.

तसेच संघात वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद आणि दीपक चाहर यांनाही पहिल्या वनडेसाठी अंतिम 11 जणांच्या संधी मिळाली आहे.

पहिल्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हन

भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन

बांगलादेश - लिटन दास (कर्णधार), अनामूल हक, नजमुल हुसेन शांतो, शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्ला, अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराज, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, इबादोत हुसैन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

SCROLL FOR NEXT