Team India | India vs Australia | Delhi Test Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: टीम इंडियानं मैदान मारलं! दिल्ली कसोटीत कांगारुंचा पराभव, जडेजा-अश्विन विजयाचे हिरो

जडेजा आणि अश्विन यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने दिल्ली कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली आहे.

Pranali Kodre

India vs Australia, 2nd Test: भारतीय क्रिकेट संघाने रविवारी (१९ फेब्रुवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या या विजयात रविंद्र जडेजा आणि आर अश्विन या फिरकीपटूंनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी माफक 115 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने दुसऱ्या डावात 26.4 षटकात 4 विकेट्स गमावत 118 धावा करत पूर्ण केला. या डावात भारताकडून चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक नाबाद 31 धावा केल्या. तसेच रोहित शर्मानेही 31 धावा केल्या.

भारताकडून सलामीला खेळताना केएल राहुल पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. त्याला नॅथन लायनने एक धावेवरच बाद केले. तसेच भारताचे विराट कोहली (20) आणि श्रेयस अय्यर (12) हे देखील स्वस्तात बाद झाले. पण नंतर पुजाराने श्रीकर भरतसह (23*) भारताला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने 2 विकेट्स घेतल्या. तसेच टॉड मर्फीने 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाची सुरूवात 13 व्या षटकापासून आणि 1 बाद 61 धावांपासून खेळायला सुरुवात केली. मात्र पहिल्या दोन तासातच ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वबाद झाला. दुसऱ्या दिवसाखेर नाबाद असलेल्या ट्रेविस हेडला अश्विनने 13 व्या षटकात 43 धावांवर आणि जडेजाने मार्नस लॅब्युशेनला 22 व्या षटकात 35 धावांवर बाद केले.

त्याआधी अश्विनने धोकादायक स्टीव्ह स्मिथला 9 धावांवरच 19 व्या षटकात माघारी धाडले होते. तसेच अश्विनने डेव्हिड वॉर्नरचा बदली खेळाडू म्हणून खेळायला उतरलेल्या मॅट रेनशॉलाही 2 धावांवरच पायचीत केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था 5 बाद 95 अशी झाली होती.

यानंतर जडेजाने ऑस्ट्रेलियाची तळातली फलंदाजी पूर्ण फोडून काढली. त्याने कोणालाही फारकाळ टिकून दिले नाही. त्याने ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या पाचही विकेट्स पुढच्या 18 धावांच्या आत काढल्या. यासह त्याने या डावात 7 विकेट्सही पूर्ण केल्या. तसेच अश्विनने या डावात 3 विकेट्स घेतल्या. या दोघांनीच संपूर्ण ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 31.1 षटकातच 113 धावांवर संपवला.

पण पहिल्या डावात 1 धावेची आघाडी मिळाल्याने ऑस्ट्रेलियानी भारतासमोर 115 धावांचे आव्हान ठेवले होते. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेड आणि मार्नस लॅब्युशेन यांच्याव्यतिरिक्त कोणालाही दोन आकडी धावसंख्या पार करता आली नाही.

त्याआधी पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 263 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि पीटर हँड्सकॉम्ब यांनी अर्धशतके झळकावली होती. तसेच भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर जडेजा आणि अश्विन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या होत्या.

तर, भारताला पहिल्या डावात 262 धावा करता आल्या होत्या. भारताकडून अक्षर पटेलने 74 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्याने ही खेळी करत असताना आर अश्विन (३७) बरोबर 114 धावांची भागीदारीही केली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेण्यात अपयश आले. या डावात ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

SCROLL FOR NEXT