R Ashwin  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS, Video: अश्विनच्या फिरकीसमोर ऑसी फलंदाजांनी टाकल्या नांग्या, पाहा कशा गेल्या विकेट्स

आर अश्विनने नागपूर कसोटीच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी उद्धस्त करण्याच मोलाचा वाटा उचलला होता.

Pranali Kodre

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात नागपूरमध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात भारताने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताच्या या विजयात 8 विकेट्स घेत आर अश्विनने मोठे योगदान दिले.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 91 धावांवर गुंडाळण्यात अश्विनचा मोठा हात होता. त्याने या डावात 5 विकेट्स घेतल्या. त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात त्याने 3 विकेट्स घेतल्या होत्या.

दुसऱ्या डावात अश्विनची शानदार गोलंदाजी

ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात अश्विनने भारताला पहिलेच यश मिळवून दिले होते. त्याने दुसऱ्याच षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाची विकेट घेतली. त्याने टाकलेला चेंडू ख्वाजाने मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूने वळण घेतल्याने त्याच्या बॅटची कड घेत चेंडू स्लीपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीकडे गेला. विराटनेही चूक न करता झेल घेतला.

त्यानंतर अश्विनने ऑस्ट्रेलियाची मधली फळीही पूर्ण उध्वस्त केली. त्याने 14 व्या षटकात डेव्हिड वॉर्नरला आधी बाद केले. वॉर्नर 10 धावांवर अश्विनविरुद्ध पायचीत झाला. त्याने रिव्ह्यू देखील घेतला होता. पण रिव्ह्यूमध्ये अंपायर कॉल आल्याने वॉर्नरला माघारी परतावे लागले. त्यामुळे अश्विनला या डावातील दुसरी विकेट मिळाली.

वॉर्नरनंतर अश्विनने मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब आणि ऍलेक्स कॅरे यांनाही स्वस्तात बाद केले. या तिघांनाही अश्विनने पायचीत पकडले होते. विशेष म्हणजे या तिन्ही विकेट्सवेळी रिव्हूची मागणी झाली होत, ज्यात निकाल अश्विनच्या बाजूने लागले. अश्विनने कॅरेची विकेट घेत या डावातील 5 विकेट्स पूर्ण केल्या.

अश्विनने पहिल्या डावातही चांगली गोलंदाजी करताना ऍलेक्स कॅरे, पॅट कमिन्स आणि स्कॉट बोलंड यांना बाद केले होते.

अश्विनचा मोठा विक्रम

अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची ही 31 वी वेळ होती. तो कसोटीत सर्वाधिकवेळा एका डावात 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत अनिल कुंबळेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. कुंबळेने 35 वेळा एका कसोटी डावात 5 पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.

भारताने जिंकला सामना

पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 177 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने पहिल्या डावात सर्वबाद 400 धावा करत 223 धावांची आघाडी घेतली होती. ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या डावात 91 धावांवर बाद झाल्याने भारताने हा सामना एका डावानेच आपल्या नावे केला. आता भारताचा दुसरा सामना दिल्लीला 17 मार्चपासून सुरू होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

Horoscope 22 July 2026: कुणाला धनलाभ, तर कुणाला मानसिक ताण! आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट; 'या' राशींचे चमकणार तारे

Double Murder Case: रक्ताचे नाते ठरले वैरी! दोन पोटच्या मुलांनीच केली आई-वडिलांची निर्घृण हत्या; कौटुंबिक वादातून उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT