Australia Cricket Team Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया टेंशनमध्ये! कमिन्स मायदेशी परतल्यावर आता 'हा' मॅचविनरही भारत दौऱ्यातून बाहेर

भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या समोरील संकटांमध्ये सध्या वाढ होताना दिसत आहे. त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज या दौऱ्यातून बाहेर झाला आहे.

Pranali Kodre

India vs Australia: भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभव स्विकारावा लागला आहे. त्यातच आता वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड भारत दौऱ्यातून बाहेर गेला आहे.

हेजलवूड गेल्या अनेक दिवसांपासून टाचेच्या वरच्या भागातील दुखापतीचा सामना करत आहे. हेजलवूडने काही दिवसांपूर्वीच ट्रेनिंगला सुरुवातही केली होती. मात्र, तो अद्यापही या दुखापतीतून सावरलेला नाही. तो या दुखापतीमुळे भारताविरुद्ध पहिल्या दोन्ही कसोटीतही खेळू शकला नव्हता.

आता तो परत मायदेशी परतणार असून सिडनीमध्येच त्याच्या दुखापतीवर काम करणार असल्याचे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनल्ड यांनी सांगितले आहे.

त्याचबरोबर डेव्हिड वॉर्नरच्या खेळण्यावरही सध्या प्रश्नचिन्ह आहे. त्याला दिल्लीमध्ये दुसरा कसोटी सामना खेळताना दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याने दुसऱ्या डावात फलंदाजीही केली नव्हती. दुसऱ्या डावात त्याच्याऐवजी मॅट रेनशॉ याने फलंदाजी केली होती.

कमिन्सही परतला मायदेशी

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स त्यांच्या कौटुंबिक कारणामुळे मायदेशी परतणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्याच्या कुटुंबातील सदस्य आजारी असल्याने तो मायदेशी परतणार आहे. मात्र तो भारताविरुद्ध 1 मार्चपासून इंदोरमध्ये सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीपूर्वी पुन्हा ऑस्ट्रेलियन संघात सामील होईल, अशी अपेक्षा आहे.

ग्रीन-स्टार्क तिसरा कसोटी खेळणार

भारताविरुद्ध पहिल्या दोन कसोटीला मुकलेले कॅमरॉन ग्रीन आणि मिशेल स्टार्क तिसऱ्या कसोटीतून ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन करण्याची शक्यता दाट आहे. या दोघांनाही बोटाची दुखापत झाली होती. ज्यामुळे त्यांना पहिल्या दोन कसोटीत खेळता आले नव्हते. पण आता हे दोघेही तिसरा कसोटी सामन्यासाठी सज्ज असल्याचे मॅकडोनल्ड यांनी सांगितले आहे.

याशिवाय टॉड मर्फीलाही छोटी दुखापत आहे, मात्र इंदोर कसोटीपूर्वी तो पूर्ण फिट असेल असेही मॅकडोनल्ड यांनी सांगितले आहे.

ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत पिछाडीवर

सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत पहिले दोन सामने ऑस्ट्रेलियाने गमावले असल्याने त्यांनी मालिका विजयाची संधीही गमावली आहे. आता त्यांना मालिका वाचवण्यासाठी इंदोरला होणारा तिसरा सामना आणि 9 मार्चपासून अहमदाबादला होणारा चौथा सामना जिंकावा लागणार आहे, नाहीतर त्यांच्यावर मालिका गमावण्याची नामुष्की ओढावेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa PWD Workers Regularisation: 1,399 ‘PWD’ कामगारांना हायकोर्टचा मोठा दिलासा; 9 फेब्रुवारी 2021 पासून सेवेत, वरिष्ठता आणि निवृत्तीवेतनाचे सर्व लाभ देण्याचे स्पष्ट निर्देश

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

SCROLL FOR NEXT