Nathan Lyon  Dainik Gomantak
क्रीडा

India vs Australia: टीम इंडियाला नडतोय ऑस्ट्रेलियाचा लायन! कुंबळेचा मोठा रेकॉर्डही काढला मोडीत

Border-Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकीपटू नॅथन लायनने अनिल कुंबळेचा मोठा रेकॉर्ड मोडला आहे.

Pranali Kodre

Nathan Lyon: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसरा सामना शुक्रवारी (3 मार्च) संपला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सने विजय मिळवत मालिकेतील 2-1 अशी भारताची आघाडी कमी केली.

ऑस्ट्रेलियाच्या या विजयात फिरकीपटू नॅथन लायनने महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने या सामन्याच्या पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 8 अशा मिळून 11 विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याने अनिल कुंबळेचा मोठा विक्रम मोडला आहे.

लायनने मोडला कुंबळेचा विक्रम

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील खेळल्या जाणारी प्रत्येक कसोटी मालिका बॉर्डर-गावसकर ट्रॉफी म्हणून ओळखली जोते. दरम्यान, बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये नॅथन लायनने आत्तापर्यंत 25 कसोटी सामने खेळले असून 31.92 च्या सरासरीने 113 विकेट्स घेतल्या आहेत.

त्यामुळे आता तो कुंबळेला मागे टाकत बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो अव्वल क्रमांकावर आला आहे. या यादीत कुंबळे आता दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. त्याने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये 20 सामन्यांत 30.32 च्या सरासरीने 111 विकेट्स घेतल्या आहेत.

या यादीत 107 विकेट्ससह आर अश्विन तिसऱ्या क्रमांकावर आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये 100 पेक्षा जास्त विकेट्स आत्तापर्यंत केवळ लायन, कुंबळे आणि अश्विन या तिघांनाच घेता आल्या आहेत.

मुरलीधरनलाही टाकले मागे

दरम्यान, लायनने भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 113 विकेट्स घेतल्या असल्याने त्याने श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनलाही मागे टाकले आहे. मुरलीधरनने भारताविरुद्ध कसोटीत 22 सामन्यांत 105 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे लायन आता भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा फिरकीपटू ठरला आहे.

तसेच भारताविरुद्ध कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या एकूण गोलंदाजांच्या यादील लायन 113 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आहे. त्याने भारताविरुद्ध 35 कसोटी सामन्यांत 139 विकेट्स घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT