Rahul Dravid  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: '6'4 फूटाचा गोलंदाज असेल तर सांगा', डावखुऱ्या पेसरच्या प्रश्नावर द्रविडचे रोखठोक उत्तर

डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांबद्दलच्या प्रश्नावर भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडने रोखठोक उत्तर दिले आहे.

Pranali Kodre

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून या मालिकेतील दुसरा सामना 17 मार्चपासून दिल्लीला होणार आहे. यापूर्वी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने पत्रकारांशी संवाद साधताना अनेक विषयांवर भाष्य केले. दरम्यान, यात डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांबद्दलही त्याने प्रतिक्रिया दिली.

पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने द्रविडला भारतीय संघात डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांची कमी असल्याबद्दल प्रश्न विचारला. यादरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्क आणि पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदी या गोलंदाजांची उदाहरणे दिली. तसेच त्याने भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा आणि इरफान पठाण यांची नावे घेतली.

या प्रश्नावर उत्तर देताना द्रविड म्हणाला, 'डावखुरा वेगवान गोलंदाज अनेक विविधता घेऊन येतो. तुम्ही झहीर खानचे नाव विसरलात. पण निवड समीती आणि संघव्यवस्थापन अशी प्रतिभा असलेल्या खेळाडूंवर लक्ष ठेवून आहे. अर्शदीप सिंगने नुकतीच वनडेमध्ये चांगली कामगिरी केली. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना 4-5 विकेट्सही घेतल्या. तो युवा असून प्रगती करत आहे.'

'त्याच्याशिवाय देखील काही खेळाडू आहेत, जे चांगली कामगिरी करत आहेत. पण फक्त डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणून भारतीय संघात एखाद्याला संधी मिळणार नाही, त्यासाठी त्याला चांगली कामगिरीही करावी लागेल.'

द्रविड हे उत्तर देत असताना त्या पत्रकाराने त्याला मध्ये थांबवत डावखुरे वेगवान गोलंदाज आपल्या फलंदाजांसमोर अनेकदा आव्हान निर्माण करत असल्याचे सांगितले.

ज्यावर द्रविडने चटकन उत्तर दिले की 'जर तुमच्याकडे 6 फुट 4 इंच उंची असलेला गोलंदाज असेल तर सांगा. तुम्ही मिशेल स्टार्क आणि शाहिन आफ्रिदीचे नाव घेतले. पण भारतात 6 फुट 5 इंचाच्या जवळपास उंची असेलेले डावखुरे वेगवान गोलंदाज खूप क्वचित सापडतात.'

'आम्ही या विभागात लक्ष घालत आहोत. आम्हाला डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांचे महत्त्व माहिती आहे. पण केवळ तुम्ही डावखुरे वेगवान गोलंदाज असून चालणार नाही, त्यासाठी तुमची कामगिरीही महत्त्वाची आहे. झहीर खान असो किंवा आशिष नेहरा, ते केवळ डावखुरे वेगवान गोलंदाज होते म्हणून त्यांना संधी मिळाली नव्हती, तर ते खरोखर चांगले गोलंदाज होते म्हणून त्यांना संधी देण्यात आलेली.'

दरम्यान, द्रविडने अर्शदीप, खलील अहमद, मुकेश चौधरी अशा काही वेगवान गोलंदाजांची नावेही घेतली, ज्यांवर सध्या लक्ष दिले जात आहे.

भारतीय संघ मालिकेत आघाडीवर

सध्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघ 1-0 अशा आघाडीवर आहे. भारताने नागपूरला झालेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला 1 डाव आणि 132 धावांनी पराभूत केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT