India vs Australia | Indore Pitch Dainik Gomantak
क्रीडा

BCCI चे मोठे पाऊल! ICC ने इंदूर खेळपट्टीवर दिलेल्या निर्णयाला देणार आव्हान; जाणून घ्या प्रकरण

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात इंदूरला झालेल्या तिसऱ्या कसोटीतील खेळपट्टीबाबत आयसीसीने काही दिवसांपूर्वी मोठा निर्णय घेतला होता, पण आता त्याच्याविरुद्ध बीसीसीआयने मोठे पाऊल उचलले आहे.

Pranali Kodre

India vs Australia Indore Test Pitch: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात नुकतीच चार सामन्यांची कसोटी मालिका पार पडली होती. या मालिकेत भारताने 2-1 अशा फरकाने विजय मिळवला. मात्र, या मालिकेतील इंदूरला पार पडलेल्या तिसऱ्या कसोटीच्या खेळपट्टीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने वाईट रेटिंग दिले होते. पण आता याबद्दल बीसीसीआयने मोठे पाऊल उचलले आहे.

इंदूरमधील होळकर क्रिकेट स्टेडियममधील या सामन्यासाठी वापरण्यात आलेल्या खेळपट्टीला आयसीसीकडून वाईट (Poor) असे रेटिंग देण्यात आले होते. तसेच तीन डिमिरिट पाँइंट्सही देण्यात आले होते. पण आता आयसीसीच्या या कारवाईविरुद्ध बीसीसीआयने अपील केले आहे.

अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार आयसीसीचे दोन सदस्ययी पॅनल आता या प्रकरणाची चौकशी करेल. त्यानंतर आयसीसीच्या निर्णयाची समीक्षा करून पुढील 14 दिवसात निर्णय सुनावेल.

या पॅनलमध्ये आयसीसी जनरल मॅनेजर आणि क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष असतील. म्हणजेच सौरव गांगुली आणि वसिम खान हे दोघे या प्रकरणात आता लक्ष घालतील. गांगुली क्रिकेट कमिटीचा अध्यक्ष आहे, तर वसिम खान जनरल मॅनेजर आहेत. दरम्यान, अशीही शक्यता आहे की बीसीसीआयने अपील केले असल्याने गांगुलीऐवजी दुसऱ्या सदस्याची या पॅनलमध्ये निवड होऊ शकते.

इंदूरचा सामना अडीच दिवसात संपला

इंदूरला झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने केवळ अडीच दिवसात भारताविरुद्ध विजय मिळवला होता. या खेळपट्टीवर सुरुवातीपासूनच फिरकी गोलंदाजांना मदत मिळत होती. सामन्याच्या पहिल्याच दिवशी एकूण 14 विकेट्स गेल्या होत्या.

तसेच या सामन्यात गेलेल्या 31 विकेट्सपैकी 26 विकेट्स फिरकीपटूंनी काढल्या होत्या, तर 4 विकेट्स वेगवान गोलंदाजांना मिळाल्या होत्या. तसेच एक विकेट रनआऊटच्या रुपात गेली होती.

या सामन्याचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी या खेळपट्टीबद्दल रिपोर्ट देताना संगितले होते की 'खेळपट्टी खूप कोरडी होती आणि बॅट आणि बॉल यांच्यात समतोल साधला जात नव्हता. सुरुवातीपासूनच फिरकी गोलंदाजांना मदत मिळत होती. सामन्यातील पाचवा चेंडू खेळपट्टीच्या पृष्टभागामुळे खराबही झाला होता. तसेच खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजीसाठी काहीच मदत नव्हती, तसेच संपूर्ण सामन्यात बॉलला अनिश्चित बाऊन्स मिळत होता.'

आयसीसीच्या नियमांनुसार खेळपट्ट्यांना 6 प्रकारात रेटिंग दिले जाते. यामध्ये खूप चांगली (Very Good), चांगली (Good), सामन्य (Average), सरासरीपेक्षा कमी गुणवत्ता असलेली (Below Average), वाईट (Poor), अयोग्य (Unfit) अशा 6 प्रकारचे रेटिंग दिले जाते.

यामध्ये सरासरीपेक्षा कमी गुणवत्ता असलेली, वाईट आणि अयोग्य अशा रेटिंग मिळालेल्या खेळपट्ट्यांच्या स्टेडियमला डिमिरिट पाँइंट दिले जातात. आयसीसीच्या नियमानुसार पाच वर्षांच्या कालावधीत जर एकाद्या ठिकाणाचे 5 डिमिरिट पाँइंट्स झाले, तर त्या स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळवण्यासाठी 12 महिन्यांची बंदी घालण्यात येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Apostille Process: परदेशात जाणाऱ्या गोवेकरांसाठी खूशखबर! कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया झाली सुलभ; सरकारकडून 'SOP' जाहीर

Babush Monserrate Santa Cruz Office: "परवानगी मागितली असती तर नकारच दिला असता!", बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यालयावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Konkan to Akkalkot ST Bus: कोकणवासीयांसाठी स्वामींचं दर्शन झालं सोपं! सिंधुदुर्गातून अक्कलकोटसाठी रोज धावणार 'लालपरी'; मार्ग, वेळ जाणून घ्या

VIDEO: वंदे भारतमध्ये धक्कादायक प्रकार! रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने ड्रायव्हर केबिनमध्ये बनवली रील; व्हिडिओ Viral होताच कारवाईचे आदेश

Jharkhand Mob Lynching: अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपातून 150 जणांच्या जमावाकडून तरुणाची हत्या; आई-वडिलांना बांधून मुलावर काठ्या-दगडांनी हल्ला

SCROLL FOR NEXT