Virat Kohli | Steve Smith Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: कधीकाळी एकमेकांचे दुश्मन बनलेल्या विराट-स्मिथमध्ये दिसला 'ब्रोमान्स', Video viral

Virat Kohli - Steve Smith: अहमदाबाद कसोटीदरम्यान विराट आणि स्मिथ यांच्यात बॅटवरून बराचवेळ चर्चा झाल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Pranali Kodre

Ahmedabad Test: अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात चौथा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात पहिल्या तिन्ही दिवशी फलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. दरम्यान तिसऱ्या दिवशी विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांच्यात दिसलेल्या मैत्रीने सर्वांचेच लक्ष वेधले.

ऑस्ट्रेलियाला 480 धावांवर बाद केल्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या भारताकडून तिसऱ्या दिवशी विराटने नाबाद अर्धशतक ठोकले होते. दरम्यान विराट ही खेळी करताना एकदा ड्रिंक ब्रेक झालेला असताना स्मिथने येऊन विराटची बॅट तपासली होती.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज पाणी घेऊन आले होते. त्यावेळी विराट खाली बसलेला होता. त्यादरम्यान स्मिथ त्याच्याजवळ आला आणि काहीतरी त्याला म्हणत असताना त्याची बॅट हातात घेतो आणि शॉट मारल्याची कृती करतो.

त्यानंतर ते दोघेही चालत खेळपट्टीकडे जात असताना त्यांच्यात बॅटबद्दल काही तरी चर्चा होत असल्याचेही लक्षात येत आहे. तसेच व्हिडिओच्या शेवटी दोघेही काहीतरी मजेशीर संवाद झाल्याने हसतानाही दिसत आहेत.

स्मिथ आणि विराटच्या या व्हिडिओला सध्या सोशल मीडियावरून चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

खरंतर काही वर्षांपूर्वी मैदानात झालेल्या वादांमुळे या दोघांमधील नाते फारसे चांगले नव्हते. पण आता मधल्या काही वर्षांनंतर हे दोघांनाही ते वाद मागे सोडल्याचे दिसून येत आहे. दोन वर्षांपूर्वी या दोघांच्या मुलाखतीतूनही हे समोर आले होते की दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल कोणतीही कटू भावना नाही.

दरम्यान, अहमदाबाद कसोटीत तिसऱ्या दिवसाखेर विराट 59 धावांवर नाबाद होता. त्याच्याबरोबर रविंद्र जडेजा 16 धावांवर नाबाद होता. त्यापूर्वी भारताकडून शुभमन गिलने 128 धावांची शतकी खेळी केली होती.

तसेच चेतेश्वर पुजाराने 42 आणि कर्णधार रोहित शर्माने 35 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने तिसऱ्या दिवसाखेर 99 षटकात 3 बाद 289 धावा केल्या होत्या. तसेच भारत तिसऱ्या दिवसानंतरही 191 धावांनी पिछाडीवर होता. त्यामुळे भारताला आता चौथ्या दिवशी ही पिछाडी भरून आघाडी घेण्याचे आव्हान असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT