Virat Kohli
Virat Kohli  Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: 'शतकांचा अमृत महोत्सव', विराटने 186 धावा ठोकताच भन्नाट मीम्स व्हायरल

Pranali Kodre

Socia Media Reaction After Virat Kohli Century: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे कसोटी मालिकेतील चौथा सामना झाला. या सामन्यात चौथ्या दिवशी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने शतक केले आहे. त्यामुळे त्याच्या शतकानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत.

विराटचे तीन वर्षांनी कसोटी शतक

विराटने या कसोटीत भारताकडून खेळताना  364 चेंडूत 186 धावांची खेळी केली. हे विराटचे कसोटी क्रिकेटमधील 28 वे शतक, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 75 वे शतक ठरले आहे. महत्त्वाचे म्हणजे विराटने 1205 दिवसांनी कसोटीत शतक केले आहे.

त्याने यापूर्वी त्याचे अखेरचे शतक म्हणजेच 27 वे कसोटी शतक 23 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेशविरुद्ध कोलकाता कसोटीत केले होते. त्यानंतर आता तब्बल 3 वर्षांनी विराटला कसोटी शतक करण्यात यश आले आहे.

चाहत्यांच्या प्रतिक्रिया व्हायरल

दरम्यान, विराट हा कसोटी सामना खेळण्यापूर्वी उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिरात जाऊन आला होता. तसेच त्याने गेल्या काही दिवसात काही मंदिरांना आणि आश्रमांना भेट दिली आहे. याचीच आठवण काही चाहत्यांना झाली असून त्यांनी याचा संबंध त्याच्या ७५ व्या शतकाशी जोडला आहे.

तसेच काही सोशल मीडिया युजर्सने विराटचे कौतुक केले आहे, तर काहींनी सोशल मीडियावर मीम्स शेअर केले आहेत. तसेच काहींनी त्याने शतकांचा अमृत महोत्सव साजरा केल्याचे म्हटले आहे.

भारताने घेतली आघाडी

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 480 धावांवर संपुष्टात आला होता. त्यानंतर भारताने पहिल्या डावात 571 धावा करत 91 धावांची आघाडी मिळवली. भारताकडून या डावात विराट व्यतिरिक्त शुभमन गिलनेही 128 धावांची शतकी खेळी केली होती. तसेच अक्षर पटेलने 79 धावांची अर्धशतकी खेळी केली.

भारताच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायन आणि टॉड मर्फी यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तसेच मिशेल स्टार्क आणि मॅथ्यू कुहनेमन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mormugao Port: बिर्लाचा गोव्याला रामराम, महाराष्ट्रात हलविले कामकाज; आमदार संकल्प आमोणकरांवर गंभीर आरोप

PM Modi In Goa: पीएम मोदी 150 कोटी घेऊन येणार? सभेपूर्वी पंतप्रधानावर गोवा काँग्रेसकडून प्रश्नांचा भडीमार

Amthane Dam Water : ‘आमठाणे’त अखेर पाणी; जलस्रोत खात्याकडून उपाययोजना

Lok Sabha Election 2024: तेलंगणाचे CM रेवंत रेड्डी यांची जीभ घसरली; PM मोदींना म्हणाले 'काळा साप'

Goa Weather And Heatwave Update: अवकाळीनंतर पारा घटला; गोव्यात कसे राहणार हवामान? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT