Cheteshwar Pujara Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाला नडतोय पुजारा! 'हा' विक्रम करत सचिन-द्रविडच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Ahmedabad Test: चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अहमदाबाद कसोटीत फलंदाजी करताना एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

Cheteshwar Pujara complete 2000 Test Runs Against Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरू आहे. या सामन्यात फलंदाजी करत असताना भारताच्या चेतेश्वर पुजाराने मोठा विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला 480 धावांवर सर्वबाद केल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस फलंदाजीला उतरला होता. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवातही दिली.

पण शनिवारी तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात रोहितला मॅथ्यू कुहनेमनने 35 धावांवर बाद केले. त्यामुळे गिल आणि रोहित यांची सलामी भागीदारी 74 धावांनंतर तुटली. पण त्यानंतर गिलला साथ देण्यासाठी पुजारा आला.

गिल आणि पुजाराने तिसऱ्या दिवसाच्या पहिले सत्र संपेपर्यंत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना आणखी यश मिळू दिले नाही. पहिले सत्र संपले तेव्हा भारताने 37 षटकात 1 बाद 129 धावा केल्या होत्या. यावेळी पुजारा 22 आणि गिल 65 धावांवर खेळत होते.

याचदरम्यान, पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला. पुजारा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत 2000 धावा करणारा भारताचा चौथाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनाच असा कारनामा करता आला आहे.

पुजाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 24 कसोटी सामने खेळताना 51 पेक्षा अधिकच्या सरासरीने या 2000 धावा पूर्ण केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करणारे भारतीय फलंदाज

3630 - सचिन तेंडुलकर (39 सामने)

2434 - व्हीव्हीएस लक्ष्मण (29 सामने)

2143 - राहुल द्रविड (32 सामने)

2000 - चेतेश्वर पुजारा (24 सामने)*

1793 - विराट कोहली (24 सामने)*

ऑस्ट्रेलियाने उभारला धावांचा डोंगर

दरम्यान, अहमदाबाद कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने 422 चेंडूत खेळताना 180 धावांची खेळी केली. तसेच ग्रीनने 170 चेंडूत 114 धावांची खेळी केली. त्याचबरोबर 9 व्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी करणाऱ्या टॉड मर्फीने 41 आणि नॅथन लायनने 34 धावांची खेळी केली.

त्यामुळे ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 167.2 षटकात सर्वबाद 480 धावा केल्या. भारताकडून या डावात आर अश्विनने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमीने 2 विकेट्स घेतल्या, तर रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT