Virat Kohli Century Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli: अनुष्काच्या पोस्टनंतर विराटच्या आजारपणाबद्दल अक्षर पटेलने दिली अपडेट, म्हणाला...

अहमदाबाद कसोटीत विराट कोहलीने शतक केल्यानंतर तो आजारी असल्याचे अनुष्का शर्माने तिच्या पोस्टमधून सांगितले होते, याबद्दल अक्षर पटेलने महत्त्वाची माहिती दिली आहे.

Pranali Kodre

Virat Kohli Century: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसाखेर आघाडी घेतली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यामध्ये फलंदाजांचे वर्चस्व पहिल्या चारही दिवशी दिसून आले.

चौथ्या दिवशी भारताने पहिल्या डावात 571 धावांचा डोंगर उभा करत 91 धावांनी आघाडी घेतली. भारताकडून तिसऱ्या तिवशी या डावात शुभमन गिलने 128 धावांची खेळी केली होती. त्यानंतर चौथ्या दिवशी विराट कोहलीने 186 धावांची मॅरेथॉन खेळी केली. त्याला अक्षर पटेलकडून चांगली साथही मिळाली.

या डावात विराट आणि अक्षर यांच्यात 6 व्या विकेटसाठी 162 धावांची भागीदारीही झाली. पटेलने 79 धावांची खेळी केली.

अनुष्काने सांगितले विराट आहे आजारी

दरम्यान, विराटने त्याचे शतक केल्यानंतर अनुष्काने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. यामध्ये तिने विराटचा फोटो शेअर करताना लिहिले होते, 'आजारपणातही या शांत राहत खेळला, मला नेहमीच तू प्रेरणा देतो.' तिच्या या पोस्टनंतर तो आजारी असल्याचे सर्वांना कळाले होते.

Anushka Sharma Instagram Story

अक्षरने सांगितले त्याला याबद्दल माहितीच नाही

या सामन्याच्या चौथ्या दिवसानंतर झालेल्या पत्रकार परिषदेबद्दल विराट आजारी आहे का असे अक्षरला विचारले. त्यावेळी अक्षर हसत म्हणाला, 'मला माहित नाही. तो ज्याप्रकारे एकेरी-दुहेरी धावा घेत होता, त्यावरून तो आजारी असल्याचे वाटत नव्हते. या उष्ण वातावरणात त्याने इतकी मोठी भागीदारी केली. तो धावलाही चांगला. त्याच्याबरोबर फलंदाजी करताना मजा आली.'

विराटचे 3 वर्षींनी कसोटी शतक

विराटचे हे कसोटी क्रिकेटमधील 28 वे शतक असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 75 वे शतक ठरले आहे. विशेष म्हणजे त्याने 1205 दिवसांनी कसोटीत शतक केले आहे. त्याने यापूर्वी 27 वे कसोटी शतक 23 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेशविरुद्ध कोलकाता कसोटीत केले होते. त्यानंतर आता तब्बल 3 वर्षांनी विराटला कसोटी शतक करण्यात यश आले.

दरम्यान, विराट 75 आंतरराष्ट्रीय शतक करणारा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंतरचा दुसराच खेळाडू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT