R Ashwin | Ravindra Jadeja Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: रेकॉर्डब्रेक अश्विन! कुंबळेनंतर कपिल देव यांचाही मोडला 'हा' मोठा विक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंदूर कसोटीत खेळताना आर अश्विनने कपिल देव यांचा एक मोठा विक्रम मोडला आहे.

Pranali Kodre

R Ashwin Breaks Kapil Dev's Record: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात इंदूरमध्ये कसोटी मालिकेतील तिसरा सामना बुधवारपासून सुरू झाला आहे. या सामन्यात खेळताना भारताचा अनुभवी गोलंदाज आर अश्विनने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाला 109 धावांत सर्वबाद केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आघाडी घेण्यात यश मिळवले होते. पण दुसऱ्या दिवशी केवळ 11 धावांत ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स गमावल्या. यातील तीन विकेट्स आर अश्विनने घेतल्या. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 197 धावांवर संपुष्टात आला.

अश्विनने कपिल देव यांना टाकले मागे

अश्विनने या तीन विकेट्स घेतल्याने आता त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 269 सामन्यांत 689 विकेट्स झाल्या आहेत. यामध्ये त्याच्या 91 कसोटीतील 466 विकेट्सचा समावेश आहे. तसेच वनडेत त्याने 113 सामन्यांत 151 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 65 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांत 72 विकेट्स घेतल्या आहेत.

त्यामुळे आता अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांमध्ये कपिल देव यांना मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. कपिल देव यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 356 सामन्यांत 687 विकेट्स घेतल्या आहेत.

या यादीत 403 सामन्यांतील 956 विकेट्ससह अनिल कुंबळे अव्वल क्रमांकावर आहे. तसेच हरभजन सिंग या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने 367 सामन्यांत 711 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अश्विन सध्या 17 व्या क्रमांकावर आहे. या यादीत 1347 विकेट्ससह मुथय्या मुरलीधरन अव्वल क्रमांकावर आहे.

कुंबळेचाही विक्रम अश्विनने मोडलाय

सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यादरम्यानच अश्विनने कसोटी कारकिर्दी 450 विकेट्सचा टप्पा पार केला होता. त्यावेळी तो सर्वात जलद 450 कसोटी विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला होता. त्याने हा विक्रम करताना अनिल कुंबळेला मागे टाकले होते.

अश्विनने 89 कसोटी सामन्यांमध्ये 450 कसोटी विकेट्स पूर्ण केल्या होत्या, तर कुंबळेने 93 कसोटी सामने खेळताना 450 विकेटेस घेतल्या होत्या. या यादीत अव्वल क्रमांकावर मुथय्या मुरलीधरन असून त्याने 80 कसोटीत हा पराक्रम केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Nepal Flood: नदीचं खवळलेलं पाणी, पूल तुटण्याच्या मार्गावर... समोर मृत्यू दिसत असतानाही कुटुंबासाठी धावला 'बाप' Watch Video

Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Delhi Indigo Flight: मोठा अनर्थ टळला! उड्डाणानंतर इंडिगो विमानाचे इंजिन अचानक फेल; मोपा एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

SCROLL FOR NEXT